इचलकरंजी ; (प्रतिनिधी ) –– येथे शाहू काॅर्नर परिसरात सुवर्णयुग सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईत २१ जणांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे २ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात करण्यात आली
आहे.
इचलकरंजी शहर परिसरात अवैध व्यवसाय सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.याच अनुषंगाने शहरातील शाहू काॅर्नर परिसरात एका हाॅटेलच्या पिछाडीस असलेल्या बोळात सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली तीन पानी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या पथकास मिळाली होती.त्यानुसार सदर पथकाने शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सदर तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.या कारवाईत जुगार अड्डा चालक शहानूर सावळगी याच्यासह २१ जणांना ताब्यात घेवून अटक केली.यामध्ये प्रमोद शिंगारे , अब्दुल नदाफ ,रफिक मोमीन ,आनंदा दळवी ,विशाल लोले , महेश गडकरी, विरभद्र हिरेमठ, प्रफुल्ल पाटील,विजय धनवडे , सुहास कांबळे,आनंदा चन्ना ,शितल कल्यनी,लक्ष्मण जावळकोटी, संदिप बोदगे, सचिन कांबळे,बाळासो पाटील ,आण्णासो चव्हाण, शंकर चौगुले, अनिल कोळी , प्रकाश भिसे यांचाही समावेश आहे.त्यांच्याकडून रोख रक्कम १८ हजार रुपये, ३ मोटारसायकल, १३ मोबाईल हॅंडसेट व जुगार खेळाचे साहित्य असा सुमारे २ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.