36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeआरोग्य वार्ता*इचलकरंजीत निवासी ध्यान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*इचलकरंजीत निवासी ध्यान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

ब्रम्हश्री राघवेंद्र राव यांच्याकडून शिबीरार्थींना मौलिक मार्गदर्शन

इचलकरंजी ; दि. १५ ( प्रतिनिधी ) –

इचलकरंजी येथे अग्रसेन सेवा ट्रस्ट व पीएसएस
यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निवासी ध्यान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी
ब्रम्हश्री राघवेंद्र राव यांनी शास्ञशुध्द पध्दतीने ध्यानाचे मौलिक मार्गदर्शन करत शिबीरार्थींकडून ध्यान प्रात्यक्षिक करुन घेतले.

भगवंताशी एकरूप होण्यासाठी ध्यान करणे आवश्यक मानले जाते.श्वासाकडे लक्ष देऊन मन खाली करून आत्म्याशी एकरूप होणे म्हणजेच ध्यान .आत्मा म्हणजेच भगवंत.या भगवंताशी जोडले जाणे म्हणजेच ध्यान.
शरीर ,आत्मा व मन या संबंधी सविस्तर माहिती सांगितली. ध्यान केल्यामुळे मनोविकार व्याधी बऱ्या होतात. तणावमुक्ती व आजारापासून सुटका होते .जाती ,धर्म ,पंथ व श्रद्धा इत्यादी मान्यतांचा अडथळा न येता आचरण्यात येण्याजोगी साधी सोपी नैसर्गिक पद्धत म्हणजेच ध्यान. ध्यानामुळे मन शांत होवून शारीरिक व मानसिक आजार बरे होतात. स्मरणशक्ती वाढते एकाग्रता व आत्मविश्वास वाढतो. निरपेक्ष मैत्रीपूर्ण तणावमुक्त व आरोग्यपूर्ण जीवन जगता येते.बुद्धीचा विकास व अध्यात्मिक उन्नती होण्यास ध्यानाचा मोठा उपयोग होत असतो.याचेच महत्व लक्षात घेवून ध्यान परंपरेच्या प्रचार व प्रचारासाठी इचलकरंजी येथे अग्रसेन सेवा ट्रस्ट व पीएसएस
यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रेसन भवन येथे तीन दिवसीय
नि:शुल्क निवासी ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ब्रम्हश्री राघवेंद्र राव यांनी शास्ञशुध्द पध्दतीने ध्यानाचे महत्व पटवून दिले.तसेच त्यांनी ध्यान कसे करायचे ? ध्यान कोणी करायचे? ध्यान किती वेळ करायचे ?ध्यानाचे फायदे काय ? नेमकी ध्यानाची योग्य पद्धत कोणती? भगवान म्हणजे काय? तो कोठे असतो ?तसेच कर्मकांड करायचे काय? याचे सविस्तरपणे साध्या सोप्या व सरळ भाषेत उदाहरणासह सांगितले.यावेळी त्यांनी शिबीरार्थींकडून ध्यानाचे प्रात्यक्षिक करुन घेतले.


या शिबीराचे संयोजन अनिल जाधव ,संजय पोद्दार, शंकर उडुपी ,जयप्रकाश गोयंका यांनी केले होते .या शिबिरासाठी सांगली ,सातारा, कोल्हापूर ,पुणे,अहमदाबाद व इचलकरंजीच्या आसपासच्या जवळ जवळ 75 लोकांनी लाभ घेतला. सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी
अग्रसेन भवनचे अध्यक्ष पवन टिबरेवाल ,
अनिल जाधव, संजय पोद्दार ,डॉ.अर्जुन कुंभार ,डॉ. कारेकर ,ॲडव्होकेट ताजुंनिसा शेख ,
जयप्रकाश गोयंका ,डॉ अमित राठी ,विजयकुमार सोनी, भैरू शेठ अग्रवाल, एपीआय ठोंबरे , संदीप जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]