25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeक्रीडा*इचलकरंजीत शनिवारी महिला बुद्धीबळ स्पर्धा*

*इचलकरंजीत शनिवारी महिला बुद्धीबळ स्पर्धा*

इचलकरंजी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्यावतीने शनिवारी 11 मार्च रोजी महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लायन्स ब्लड बँक, दाते मळा, इचलकरंजी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला शनिवारी सकाळी दहा वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी २५० रुपये शुल्क ठेवण्यात आलेले आहे. स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धा मुली व महिलांच्या एकत्र गटात होणार आहेत. प्रत्येकस दहा मिनिटे व पाच सेकंद वाढीव वेळ प्रत्येक चालीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेनंतर संध्याकाळी पाच वाजता विजेत्या मुली व महिला खेळाडूंना 38 बक्षिसे (आकर्षक ट्रॉफी व पदक) दिली जाणार आहेत. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना नाष्टा देण्यात येईल. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा , असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, सचिव सुभाष तोष्णीवाल ,खजिनदार संदिप सुतार ,लेडिज विंग चेअरमन कनकश्री भट्टड , कांता बालर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी , राज्य पंच रोहित पोळ (9657333926), कृष्णा भराडिया (९३७०३२८२८२) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी ,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]