इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ इचलकरंजी या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये
अध्यक्ष डॉ. राजन फुटाणे यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.अरुण पाटील यांची तसेच लेडीज विंग अध्यक्षपदी डॉ.वैशाली लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ इचलकरंजी या संस्थेच्या
नूतन कार्यकारिणीमध्ये सचिवपदी डॉ. प्रदीप वास्के, खजिनदारपदी डॉ. अभिजीत भोसले व डॉ.कुलदीप पाटील , असोसिएशन लेडीज विंग अध्यक्षपदी डॉ.वैशाली लोखंडे ,महिला सचिवपदी डॉ.अफसाना मुजावर यांची निवड करण्यात आली.तसेच स्पोर्ट्स कमिटी, सीएमई कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.

यावेळीसंस्थेच्यावतीनेनूतनपदाधिकाऱ्यांचासत्कारकरण्यातआला.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनीवर्षभरात विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळीमावळते अध्यक्ष डॉ.राजेश कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.या सभेस सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.