23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

*इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

इचलकरंजी : प्रतिनिधी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज बुधवारी
महानगरपालिकेच्या राजाराम स्टेडियम येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विनायक मुरदंडे आणि कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजीचे सुहास पवळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम, तसेच ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली.


योग,प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महानगरपालिकेच्या आवाहना नुसार शहरवासीयांनी त्याचबरोबरच महानगरपालिकेचे शाहू हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, दत्ताजीराव कदम ए.एस.सी. महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रामभाऊ जगताप हायस्कूलचे आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम स्टेडियम येथे योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात
मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख,माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, विकास अडसूळ, कामगार अधिकारी विजय राजापुरे, क्रिडा अधिकारी शंकर पोवार, उद्योजक शामसुंदर मर्दा, सुरेश जाजु, अनिल डाळ्या, पांडुरंग मेटे, रवीकुमार शर्मा, राहुल रायनाडे, नारायण जोशी, राजेंद्र गवळी, वैशाली नायकवडे, महिला बाल कल्याण अधिकारी सीमा धुमाळ, नमिता खोत मोहन विरकर, चंद्रकांत कोरे, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]