माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी मानले मतदारांचे आभार
विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
लातूर प्रतिनिधी : शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत कृषि विकास पॅनलचसर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठया मताधिक्कयांने विजयी झाले आहेत. यानिवडणूकीत कृषि विकास पॅनलच्या सकारात्मक प्रचाराने शेतकरी विकासपॅनलच्या वतीने राबवण्यात आलेले अफवा तंत्र आणि नकारात्मक प्रचाराला
धोबीपछाड केले आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतील कृषि विकास पॅनलचेसोसायटी सर्वसाधारण मतदार संघात जगदीश जगजीवनराव बावणे (६०२), श्रीनिवासश्रीराम शेळके (५७४), लक्ष्मण रामकृष्ण पाटील (६०५), युवराज मोहनराव जाधव,
(५९७), आनंद रामराव पाटील(६०९), आनंद धोंडीराम पवार (६००), तुकारामग्यानदेव गोडसे (६०८), महिला मतदार संघात सुरेखा बळवंत पाटील (६२३),लतिका सुभाष देशमुख (६२६), इमाव मतदार संघात सुनिल नामदेवराव पडीले(६१०), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात सुभाष दशरथ घोडके (६२९),ग्रामपंचायत मतदार संघात अनिल सुभाष पाटील (६०१), शिवाजी किसनराव देशमुख(६०९), अनुसुचीत जाती मतदार संघात बालाजी हरिश्चंद्रवाघमारे (६५०),आर्थिकदृष्टया दुर्बल घटक मतदार संघात सचिन विष्णु सुर्यवंशी (६०५),
व्यापारी मतदार संघ बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा (९४९), सुधीर हरिश्चंद्रगोजमगुंडे (८१९), हमाल व तोलारी मतदार संघात शिवाजी दौलतराव कांबळे (८९७)विजयी झाले आहेत.
तर या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सहकारी संस्थामतदार संघातीलउमेदवार शिंदे विक्रम श्रीधरराव (३३८), बेद्रे उमेश अमृतराव (३३२), शिंदेसंतोष मोहनराव (३१९), भिसे बाबासाहेब साहेबराव (३२२), शिंदे शरद माणिकराव
(३२१), शिंदे सुरज जगन्नाथ (३२४),पिसाळभैरवनाथआनंदराव (२५७), महिलामतदार संघातील कदम धनश्री बालासाहेब (३३८), वायाळ स्वयंम संभाजी (३३७),इमाव मतदार संघातील चामले बापुराव लिंगराम (३६९), विमुक्त जाती भटक्याजमाती मतदार संघ सोट भागवतराव श्रीरंगराव (३६२), ग्रामपंचायतमतदार संघगवळी सुधाकर प्रभाकर (३४९), खंदाडे बाबु हणमंतराव (३९८), अनुसुचित जातीमतदार संघ सवई संजू बबन (३६९), आर्थिकदृष्टया दुर्बल घटक मतदार संघ कावळे
विश्वास वसंतराव (३९१), व्यापारी मतदार संघ पाटील दिनकलक्ष्मणराव(७६६), कोरे नितीन सिद्रामअप्पा (७३१), हमाल व तोलारी मतदार संघ वाघमारेनागेश रंगराव (४०३)
कृषि विकास पॅनलने ही निवडणूक केंद्रीय गृहमंत्री शिवराजपाटील चाकूरकर,माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे आशीर्वाद घेऊन लढवली.माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामिणचे आमदार धीरज
विलासरावदेशमुख,माजीआमदारवैजनाथशिंदे,माजीआमदारत्रिबंक भिसे,माजी सभापती ललीतभाई शहा, आबासाहेब पाटील,दिलीपदादा नाडे यांनी प्रमुखप्रचाराची धुरा सांभाळली.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हापरिषदेचे सदस्यधनंजय देशमुख, विलास बॅकेचे उपाध्यक्ष ॲड. समद पटेल, टवेन्टिवन शुगर्सचेव्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखाना व्हा. चेअरमनरविद्र काळे,
बाजार समिती माजी उपसभापती मनोज पाटील, गोविंद बोराडे, गणेश एसआर देशमुख,गिरीष ब्याळे, रमेश पाटील, राजकुमार पाटील, स्मिता खानापूरे, सपना किसवेहे निरीक्षक व सर्व टीमने निवडणूकीत अहोरात्र परिश्रम घेतले. सर्वउमेदवार एकतर्फी विजयी झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर पून्हा
झेंडा फडकला आहे.

उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक – २०२३ चे आज शुक्रवार दि. २८एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत १८ जागांसाठी मतदान यशवंतप्राथमिक विदयालय, ग्यानबा मोरे प्राथमिक शाळा, जिजामाता कन्या प्रशालाया ठिकाणी झाले. यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघात १०६८ मतदारा पैकी १०६०मतदारांनी, सोसायटी मतदार संघात १०३५ मतदारा पैकी १०१९, व्यापारी मतदारसंघात २०५५ मतदारांपैकी १७७४ मतदारांनी तर हमाल मापाडी मतदार संघात १८२५मतदारांपैकी १५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकुणमतांचीसरासरी टक्केवारी पाहता ९०.३७ टक्के एवढेमतदान झाले.
कृषी विकास पॅनल माध्यमातून ही निवडणुक लढवीत असतांनामाजी मंत्री आमदारअमित विलासराव देशमुख यांनीउच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
काळीजीपूर्वक घेतली. याकरीता उमेदवार निवडीपासूनचचांगलेनियोजन केले.विविध संस्थाचे पदाधिकारी, स्थानीक पातळीवर कार्य करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. आमदार धीरज देशमुख यांनी कल्पक योजनांचीमाहिती देऊन अदययावत पध्दतीने प्रचार यंत्रणाराबवली.

प्रभावी व नियोजनबध्द प्रचार
कृषी विकास पॅनलची निवड झाल्यानंतर गाव पातळीवरील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईसचेअरमन, संचालक या सर्व पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांनी एकत्र करून प्रचारास सुरुवात केली. प्रत्येक मतदारापर्यंत
पोहोचण्यासाठी गावभेट, मतदार भेट, पदाधिकारी व मतदार मेळावा आयोजित करूनप्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. लातूर बाजार समितीसह जिल्हा परिषद सर्कलमधील इतर सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी (तोलारी), महिला कामगार,
मतदार बंधू-भगिनीची प्रत्यक्ष भेट घेऊन कृषी विकास पॅनललातूरच्याउमेदवाराकडून संवाद साधला गेला. विशेष म्हणजे सहकारीतील सर्व संस्थाचेपदाधिकारी प्रचारात पूर्णपणे सक्रीय राहिले याचा फायदा कृषि विकास पॅनललामिळाला आहे.
जाहीरनामा व वचनपूर्ती
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू झाल्यापासून विरोधकांचेपॅनल करणे, उमेदवार निवडणे यात मोठ्या प्रमाणात गोंधळ होता. माजी मंत्री,आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मात्र केलेल्या कामाची वचनपूर्ती व
भविष्यातकरावयाच्याकामाचाजाहीरनामामांडला.प्रचारातविरोधकांवर टीकान करता आपण केलेले काम त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवले त्यामुळे मतदारांचात्यांना कौल मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना मतदारांचा प्रतिसाद
कृषि उत्पन्न बाजार समिती ज्याच्या जीवावर चालते त्या शेतकऱ्यासाठीव शेती विकासासाठी अनेक योजना राबवण्याचे आश्वासनही कृषि विकास पॅनलच्यावतीने या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. यामध्ये कृषि परिषद, शेतकरीमेळावे, शिवारफेरी आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पारंपरिक
बियाण्याच्याबॅंकेचीऊभारणी,अदययावतकृषिअवजारांचीउपलब्धता,सेंद्रींयशेतीलाप्रोत्साहनदेण्यासाठीविशेषमोहिमेचेआयोजन, सेंद्रींयभाजीपाला विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावरडायल फॉरभाजीपाला योजना, कृषिक्षेत्रातील माहिती व घडामोडी कळण्यासाठी कृषि ग्रंथालय,कृषिमालसाठवणुकीसाठी कार्यक्षेत्रात विभागनिहाय गोडाऊन, शेतीमाल वर्गीकरण,
स्वच्छतव पॅकेजिंगयुनीट,ईमार्केटकृषिमालविपणनसेवा,निर्यातमार्गदर्शन व सुविधा केंद्र, शेतकरी, गुमास्ते,हमाल, माफाडी यांच्यामुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य व शैक्षणिक साहित्याचे वाटपकरण्या संबंधी आश्वासन या जाहीरनाम्यात दिले. या सर्वांना चांगलाप्रतिसाद मतदारांकडून मिळाला आणि यामुळे कृषिविकास पॅनलला विजय पताका
फडकवण्यात यश मिळाले.

—-
विलासराव देशमुख यांच्या विचारांचा विजय
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या विचाराप्रमाणे कृषि विकास पॅनलच्या वतीनेआजवर केलेले काम आणि भविष्यात राबवयाच्या योजानंचे नियोजन सांगून प्रचारकेला, मतदारांनी या विचाराला प्राधान्य दिले त्यामूळेच या पॅनलचेसर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठया फरकाने विजयी झाले आहेत, अशी प्रतिक्रीया
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
कृषि विकास पॅनलच्या दणदणीत विजयावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना माजीमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, आजवर लातूरतालुक्याचा कोणी विकास केला आणि यापूढे कोण करू शकतो याची जाण लातूरच्या
सूजाण नागरीकांना आहे. कोणतीही निवडणूक लोकशिक्षणाचे साधन असते. चांगलेवाईट सांगण्याची संधी यानिमित्ताने मिळते, लातूरच्या विकासासाठीनेत्यांनी उभा केलेल्या संस्था, त्यातून या भागात घडलेले परीवर्तन हेयेथील नागरीकांनी पाहिले व अनुभवले आहे.लातूरचे अर्थकारण मजबूत करणाऱ्या कृषि उत्पन्न् बाजार समितीच्या मागच्याकार्यकाळात झालेली विकासकामे आणि पूढे राबवयाच्या योजना याचा वचनपूर्तीसह
जाहीरनामा तयार करून कृषिविकास पॅनलच्या वतीने मतदारांसमोर मांडला.
मतदारांना हा सकारात्मक प्रचार चांगलाच भावला. विरोधकांच्या भुलथापा आणिअपप्रचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी कृषि विकास पॅनललाभरभरून मतदान केले आहे असे सांगून आमदार देशमुख यांनी सर्व मतदार तसेच या
निवडणूकीत परिश्रम घेतलेले पदधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे अभिनंदनकरून मनपुर्वक आभार मानले आहेत.




