33.4 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeराजकीयउत्तर प्रदेशातील दोन मतदार संघातील प्रचाराची धुरा पाशा पटेल यांच्या खांद्यावर

उत्तर प्रदेशातील दोन मतदार संघातील प्रचाराची धुरा पाशा पटेल यांच्या खांद्यावर

पक्षश्रेष्ठीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू- पटेल

*लातूर/प्रतिनिधी*-

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी कधीच न जिंकलेल्या दोन मतदार संघात प्रचाराची जबाबदारी भाजपा पक्षश्रेष्ठीने ज्येष्ठ नेते पाशा पटेल यांच्यावर सोपविली असून, त्यासाठी पाशा पटेल हे उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत.       उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाच्या योगी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांसह सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपा पूर्ण शक्तीनिशी निवडणूक मैदानात उतरला आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आतापर्यंत कधीच न जिंकलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील रामपुर खास आणि बाबा गंज या दोन विधानसभा मतदार संघाची प्रचाराची धुरा पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेते तथा स्टार प्रचारक पाशा पटेल यांच्यावर सोपविली असून, त्यांनी 12 फेब्रुवारीपासून झंजावती प्रचाराला सुरूवातही केली आहे.      पाशा पटेल हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. ते चळवळीतील नेतृत्व असून अनुभवी, अभ्यासू, आपल्या वक्तृत्वशैलीद्वारे जनतेला आकर्षित करणारे नेते आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ते भाजपाचे काम एकनिष्ठेने करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रदूषण मुक्त भारत बनविण्याच्या प्रयत्नाला बळ देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक बांबू लागवड, बॉयलरमध्ये दगडी कोळसाऐवजी बांबू वापरासाठी ते देशभर अभियान राबवित आहेत. त्यास प्रभावित होऊन अनेक ठिकाणी बांबू लागवड आणि वापर सुरू झालेला आहे.      शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी केलेले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विनंतीनुसार ते भाजपात दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांनी एकनिष्ठेने काम करताना आजवर पार पडलेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व शैली आणि गर्दी जमण्याची किमया पाहता आतापर्यंत भाजपाला जिंकता न आलेल्या रामपुर खास आणि बाबा गंज या दोन विधानसभा मतदार संघात प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली असून, ते ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन भाजपाची विचारसरणी, राज्य सरकारने केलेली विकास कामे, ध्येय-धोरणे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत जनतेसमोर मांडणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीनंतर 12 फेब्रुवारी रोजी पाशा पटेल उपरोक्त दोन मतदार संघात दाखल झाले असून, तेथे पोहोचताच त्यांनी झंजावती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे.       पक्षश्रेष्ठींनी सोपविलेली जबाबबदारी प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवून दाखवण्याका आपले प्राधान्य राहणार असून, दोन्ही मतदारसंघ पिंजून काढत आतापर्यंत भाजपाला यश न मिळालेल्या या दोन जागा जिंकण्यासाठी जीवाचे रान करू, अशी ग्वाही पाशा पटेल यांनी प्रसिद्धि माध्यमांशी बोलताना दिली.Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]