22.3 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसाहित्यउदगीर साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

उदगीर साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमांची माहिती
लातूर –

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगीरी महाविद्यालयातींल भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पुर्वतयारी आता पुर्णत्वाकडे जात आहे.
साहित्य संमेलनासाठी ७ सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. मुख्य सभामंडपात ५ हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ५३२०० चौरसपुâटाचा हा मंडप आहे तर ४० पुâट रुंदी आणि ८० पुâट लांबीचे व्यासपिठ करण्यात आलेले आहे. दुसरा मंडप ८४०० चौरस पुâटाचा आहे २० पुâट रुंदी आणि ३० पुâट लांबीचे व्यासपिठ असून या ठिकाणी परिसंवाद होणार आहेत. तिसरा मंडप ही ८४०० चौरस मिटरचा असून त्याचे व्यासपिठ २० पुâट रंंâदीचे व ४० पुâट लांबीचे करण्यात आलेले आहे. या ठिकाणी बालकुमार साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
चौथा मंडपही ८४०० चौरस मिटरचाच असून त्याचे व्यासपिठ २० पुâट रुंदीचे आणि ३० पुâट लांबीचे आहे. साहित्य संमेलनाचे खास आकर्षण असणारा कवीकट्टा या ठिकाणी आहे. पाचवा मंडप २३४० चौरस मिटरचा आहे. याचे व्यासपिठ १३ पुâट रुंदीचे आणि २६ पुâट लांबीचे आहे. याठिकाणी गझल कट्टा करण्यात आलेला आहे. महाविद्यालयाच्या बास्केट बॉलच्या मैदानावर पुस्तक प्रकाशन मंच व चित्र – कला – शिल्प प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे.
महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर ७५००० चौरसपुâटामध्ये बुक स्टॉल करण्यात आलेले आहेत. शेजारीच पुâड स्टॉल्सची व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे. महाविद्यालयाच्या नवीन मैदानात पत्र्याच्या शेडमध्ये भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे.४० पुâट रुंदीचे व ७५ पुâट लांबीचे स्वयंपाकघर आहे तर १०० पुâट रुंदीचे आणि २०० पुâट लांबीचे भोजनगृह आहे. महाविद्यालयाच्या मुख्य स्टेजसमोर व्हिआयपींसाठी भोजनगृह आणि स्वयंपाकगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
साहित्य संमेलनाच्या परिसरास भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. मुख्यसभागृहास छत्रपती शाहू महाराज सभागृह असे नाव देण्यात आलेले असून व्यासपिठाला उदयगीरी महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ.ना.य.डोळे यांचे नाव देण्यात आलेले आहे.
दुसNया सभागृहास दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आलेले आहे तर व्यासपिठाला हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील बलिदान झालेल्यांची आठवण म्हणून हुतात्मा भाई श्यामलालजी यांचे नाव देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष नथमलशेठ इनानी यांच्या कार्याचे स्मरण म्हणून एका सभागृहास त्यांचे नाव देण्यात आलेले आहे तर त्या सभागृहातील व्यासपिठाला ज्या संग्राम स्मारक विद्यालयातून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची सुरुवात झालेली त्याची आठवण म्हणून धर्मवीर अ‍ॅड.संग्रामअप्पा शेटकार यांचे नाव देण्यात आलेले आहे.
साहित्याीक व इतिहास संशोधक देविसिंह चौहान यांच्या नावाने एक सभामंडप असून तेथील कवीकट्याच्या व्यासपिठाला शांता शेळके यांचे नाव देण्यात आलेले आहे. ऊर्दु भाषेतील कवी सिवंâदर अली वज्द सभागृह असे एक सभागृह असून व्यासपिठाला कवी सुरेश भट यांचे नाव देण्यात आलेले आहे. ग्रंथ दालनास अ‍ॅड.त्र्यंबकदास झंवर यांचे नाव देण्यात आलेले आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या चित्रकलेतील कार्याचा सन्मान म्हणून कलामेळाव्यास त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुस्तक दालनास अरुण जाखडे यांचे नाव देण्यात आलेले आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारास प्र.ई.सोनकांबळे यांचे नाव देण्यात आलेले आहे.
२२ एप्रील रोजी ९५ व्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ सकाळी ८ त्ते १० या कालावधीत ग्रंथिंदडीने होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संमेलनस्थळ अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथ पुजन संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून गो.बं.देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडाचे अध्यक्ष यांचे हस्ते छत्रपती शाहू महाराज सभामंडपासमोर ध्वजारोहण होणार आहे. सकाळी १०.१० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अ‍ॅड.त्र्यंबकदास झंवर ग्रंथ दालनामध्ये डॉ.जयंत नारळीकर यांच्याहस्ते माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. १०.२० वाजता चित्र शिल्प कलादालनाचे उदघाटन कलामहर्षी बाबुराव पेंटर कला मेळा येथे प्रा.डॉ.नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते आणि प्रा.डॉ.अतुल कापडी यांच्या उपस्थितीत होणार आहे. संकाळी १०.२० वाजता लोकनेते विलासराव देशमुख परिसंवाद सभामंडप उदघाटन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी १०.२५ वाजता अभिजात मराठी दालनाचे उदघाटन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर ना.सुभाष देसाई यांच्या हस्ते व अजोय मेहता मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत होणार आहे. कवीकट्टा उदघाटन दुपारी २ वाजता शांता शेळके कविकट्ठा देवीसिंअ चौहाण सभागृहात फ.मु.शिंदे चांच्या हस्ते आणि गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी २ वाजता गझलमंचचे उद्घाटन कविवर्य सुरेश भट गझलमंच सिवंâदर अली वज्द सभागृहात होणार आहे. दुपारी २.३० वाजता पुस्तक दालनाचे उद्घाटन अरुण जाखडे प्रकाशन मंच येथे श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आणि प्रा.डॉ.नागोराव वुंâभार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी उदघाटक म्हणून जेष्ट नेते शरद पवार तर अध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष प्रा.डॉ.जयंत नारळीकर, प्रमुख अतिथी दामोदर मावजो, शिवराज पाटील चावूâरकर, अशोकराव चव्हाण, अमित देशमुख, सुभाष देसाई, पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत प्रा.डॉ.ना.य.डोळे व्यासपिठावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काय कमावले, काय गमावले या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.जनार्दन वाघमारे राहणार असून यामध्ये डॉ.निलम गोNहे, अन्वर राजन, सारंग दर्शने, अजय कुलकर्णी, राजेश करपे यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी ४.३० ते ६.३० या वेळेत मराठी साहित्यातील शेतकNयांचे चित्रण किती खरे, किती खोटे या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.अशोक ढवण राहणार आहेत तर दिलीप बिरुटे, गिरीश जाखोटिया, अण्णा वैद्य, जयद्रथ जाधव, वि.दा.पिंगळे, म.ई.तंगावार यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत निमंत्रीतांचे कवी संमेलन होणार आहे अध्यक्षस्थानी विश्वास वसेकर हे राहणार आहेत तर सुत्रसंचलन भारत सातपुते करणार आहेत. यामध्ये ललिता गादगे, केशव खटींग, अंजली कुलकर्णी, प्रभाकर साळेगावकर, डी.बी.जगत्पुरिया, संजीवनी तडेगावरक, विलास वैद्य, देविदास पुुâलारी, वीरा राठोड, अरुण पवार, हबीब भंडारे, अभय दाणी, सुर्याजी भोसले, महेश देशपांडे, बाबासाहेब सौदागर, रविंद्र कांगणे, मनोहर आंधळे, विलास कुवळेकर, विलास वरे, अभिजीत पाटील, स्वप्नील पोरे, अजय चिकाटे, उध्दव कानडे,नितीन भट, विशाल इंगोले, किशोर कवटे, शरद गावंडे, गणेश गायकवाड, सुरेश पाचकवडे, प्रमोदकुमार अणेराव, अभिजीत इंगळे, सायमन मार्टिन, राजीव जोशी, लता गुठे, कविता मोरवणकर, फ.म.शहाजिंदे, भास्कर बडे, छाया कोरगावकर, मंदिकीनी पाटील, अनुराधा नेरुरकर, आनंद पेंढारकर, फरझान इक्वाल, राजेश दिवेकर, विनय अपसिंगेकर, चंद्रशेखर मलकमपट्टे, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, अंवूâश सिंदगीकर, अनिता यलमटे, योगीराज माने, रामराजे अत्राम, रामदास कांबळे, राजा होळवुंâदे, राजेसाहेब कदम, अनिल चवळे, वैâलास होंदरणे, माधव कदम, संजय कुलकर्णी, महेंद्र गायकवाड, मधुरा सुजय गोडबोले, दुर्गाकुमार नावती, प्रकाश धर्म, अपर्णा भागवत, स्नेहलता झरकर, माधव गरड, सुधाकर तेलंग, डॉ.नागनाथ पाटील, शिवाजी जवळगेकर, आकाश देशमुख सिंधुताई दहिफळे, संदीपान पवार, शंकर राठोड, आशाताई शिंदे, मंजूषा कुलकर्णी, प्रभाकर निलेगावकर यांचा समावेश राहणार आहे. ह्े सर्व कार्यक्रम डॉ.ना.य.डोळे व्यासपिठ छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे होणार आहेत.
हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपिठ लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात
परिसंवाद ३ रा मराठी लेखिकांचे लेखन व्याज स्त्रिवादात अडकले आहे का या विषयावरील परिसंवाद दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत होणार आहे. याच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. दिलीप धोंडगे हे राहणार असून या परिसंवादामध्ये केशव तुपे, सुभद्रा चौकर, आशुतोष जावडेकर, निरजा, रमेश शिंदे,स्वाती दामोदरे यांचा सहभाग राहणार आहे.
परिसंवाद ४ हा मराठी कन्नड – तेलगू आणि उर्दू यांचा भाषिक व सांस्कृतिक अनुबंध या विषयावर होणार आहे. सायंकाळी ४.४० ते ६.३० या कालावधीत होणाNया या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश भातांब्रेकर हे राहणार आहेत तर यामध्ये चंद्रकांत भोजाळ, मल्लिका, रविंद्र शोभणे, अस्लम मिर्झा, व्ही.एस.माळी, मोहिब कादरी यांचा सहभाग राहणार आहे.
धर्मवीर अ‍ॅड. संग्रामअप्पा शेटकार व्यासपिठ नथमलशेठ इन्नानी सभागृहात दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत लोकनृत्याचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये जागरण, गोंधळ, भारुड, पोतराज, दंडार, घुसाडी, लेहंगी इत्यादीचा समावेश राहणार आहे.
५ वा परिसंवाद लेखक आणि लोकशाही मुल्ये या विषयावरील असून यामध्ये भुमिका श्रीकांत देशपांडे, संवादक दिपक पवार तर सहभाग हेमांगी जोशी, दिलीप चव्हाण, सोनाली नवांगुळ, हलिमा कुरेशी, अतुल देऊळगावकर, राजमकुमार तांगडे यांचा राहणार आहे. दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधीत हा परिसंवाद होणार आहे.
२३ एप्रील रोजी डॉ.ना.य.डोळे व्यासपिठ छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे

सकाळी ९.३० ते ११.३० या कालावधीत राजन गवस यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतकार विनोद सिरसाट,प्रमोद मुनघाटे हे राहणार आहेत. सकाळी ११.३० ते १२.३० वेळेत मान्यवर लेखक, प्रकाशक यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्याहस्ते विणा गवाणकर, निर्मलकुमार सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी १ ते २.३० या कालावधीत मी मराठी बोलतेय लेखक ना.गो.नांदापूरकर तर सादरीकरण विदर्भ साहित्य संघ नागपूर यांचे राहणार आहे.
दुपारी २.३० ते ५ वाजेपर्यंत संवाद आजच्या कादंबरीकारांशी असून संवादक दत्ता घोलप, शीतल पावसकर तर सहभाग प्रवीण बांदेकर, रमेश इंगळे उन्नादकर, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, प्रणव सखदेव, रमेश अंधारे, प्रसाद कुमठेकर यांचा राहणार आहे. दुपारी ५ ते सायंकाळी ७.३० या वेळेत कथाकथन असून अध्यक्षस्थानी अप्पासाहेब पाटील राहणार आहेत तर सहभाग माधवी घारपुरे, सरोज देशपांडे, विजया मारोतकर, राम निकम, अंबादास केदार, लक्ष्मीकमल गेडाम, रविंद्र कोकरे यांचा राहणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० मध्ये उदयोत्सव आणि रात्री ९.३० ते ११.३० या कालावधीत महाराष्ट्र महोत्सव होणार आहे.
हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपिठ लोकनेते विलासराव देशमुख सभागृह या ठिकाणी
मराठी सहित्यात निसर्गचित्रण आहे, पर्यावरण नाही हा परिसंवाद ठेवण्यात आलेला आहे. अध्यक्षस्थानी अतुल देऊळगावकर तर सहभाग प्रा.डॉ.गोमटेश्वर पाटील, अनिरुध्द मोरे, किरण वाघमारे, अनिता तिळवे, गिरीश दाबके यांचा राहणार आहे. परिसंवाद ७ वा प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शुन्यावर येऊन ठेपली आहे ! या विषयावर असून याच्या अध्यक्षस्थानी जयदेव डोळे, तर सहभाग जयप्रकाश दगडे, श्रीपाद अपराजित, धनंजय भिसे, नम्रता वागळे, अरुण समुद्रे, प्रदीप नणंदकर, दत्ताहरी होनराव यांचा राहणार आहे. दुपारी ५ ते सायंकाळी ७.३० या कालावधीत सीमावर्ती निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी लक्ष्मण लच्छमण्णा हे राहणार आहेत तर सहभाग मिनाक्षी पाटील काळे, चंद्रकांत खामकर, पांडुरंग पुठ्ठेवाड, हर्षदा सुंठणकर, माधव कौमिक कदम, रेवती दाभोळकर, मीना खोंड, हाशम पटेल, सुधीर देशपांडे, हणमंत पडवळ, पंडित कांबळे, अमृत आकरे, शफी बोल्डेकर, विलास पाटील, ईश्वर हलगरे, नयन राजमाने, शैलजा कारंडे, प्रभाकर सलगरे, दत्ताजी पवार, बाबुराव कांबळे, राजकुमार यल्लावाड, सुशीलकुमार चिमोरे, नरसिंग कदम, वीणा पाटील, राजपाल पाटील, सुनंदा सरदार, अर्चना नळगीरकर, सुरेखा गुजलवार, चंद्रदीप नादरगे, उमा व्यास, सुनिता कुलकर्णी, डॉ.जयंती अंबेगावकर, धनराज खानोरकर, सरिता शिवमुर्ती मठपती, मुवूâल बोरसे,अ.फ.भालेराव, मधु बावलकर, सुरेश हिवाळे, विवेक होळसंबरे, निलवंâठराव कांबळे, सविता कुरुंदवाडे,स्मिता मेहकरकर, शशिकांत हिंगोणेकर, रेश्मा शेख, हिना सौदागर,रंजीत शिंदे, पंजाबराव मोरे यांचा समावेश आहे.
धर्मवीर अ‍ॅड. संग्रामअप्पा शेटकार व्यासपिठ नथमलशेठ इन्नाणी सभागृहात
सकाळी ११.३० ते ११.४५ या कालावधीत बालमेळावा उदघाटन होणार आहे. उदघाटक म्हणून बाबा भांड तर प्रमुख उपस्थिती राजीव तांबे यांची राहणार आहे. बालकांचे काव्यवाचन सकाळी ११.४५ ते दुपारी १.१५ या कालावधीत होणार आहे. अध्यक्षस्थानी रसूल पठाण हे राहणार आहेत. दुपारी १.३० ते ३ कालावधीत निमंत्रितांचे बाल कवीसंमेलन होणार आहे याच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.दासू वैद्य तर सहभाग उध्दव भयवाळ, भारती सोळंखे, विनोद सिनकर, विश्वनाथ ससे, रामदास केदार, ज्योती कपिले यांचा राहणार आहे. दुपारी ३ ते ४.३० या कालावधीत आबा महाजन यांची मुलाखत होणार आहे.मुलाखतकार संजय ऐलवाड, मैत्री लांजेवार, जान्हवी जगदाळे
दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ या कालावधीत निमंत्रितांचे बाल कथाकथन होणार आहे. अध्यक्षस्थानी रसीका देशमुख तर सहभाग ाqवठ्ठल जाधव, एकनाथ आव्हाड, गेणू शिंदे आणि प्रशांत गौतम यांचा राहणार आहे.
शांता शेळके कविकट्टा देवीसिंह चौहाण सभागृहात
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कविकट्टा चालणार आहे. सुरेश भट गझलमंच, सिवंâदर अली वज्द सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीत गझलमंच चालणार आहे.

२४ एप्रील रोजी डॉ.ना.य.डोळे व्यासपिठ छत्रपती शाहू महाराज सभागृहात
दुपारी १२ ते १ या कालावधीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी २ ते ४ या कालावधीत परिचर्चा आज्ञापत्र चर्चाकार नितीन रिठे तर चर्चक अविनाश कोल्हे, राजा दिक्षीत, गणेश मोहिते, शरद निंबाळकर आणि सुरेश शिंदे हे राहणार आहेत. सायंकाळी ७.३० ते रात्री ११ या कालावधीत अवधूत गुप्ते यांची संगीत रजनी होणार आहे. यामध्ये अवधूत गुप्ते, मुग्धा कNहाडे, कौस्तुभ गायकवाड, मालविका दिक्षीत, मिलींद कुलकर्णी आणि इतरांचा सहभाग राहणार आहे.
हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपिठ लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात ८ वा परिसंवाद वचन साहित्य आणि आधुनिकता सकाळी ९ ते ११.३० या वेळेत होणार आहे. अध्यक्षस्थानी बसवलिंग पट्टदेवरु तर सहभाग अरविंद जत्ती, सुभाष देशपांडे,, स्मिता पाटील, हेमलता पाटील, उल्हास मोगलेवार, स्नेहल पाइक, इंदुमती सुतार, गणेश बेळंबे यांचा राहणार आहे. ९ वा परिसंवाद सीमा भागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार या विषवयावर दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे. अध्यक्षस्थानी सुर्यनारायण रणसुभे तर सहभाग अच्युत माने, नारायण पाटील, उषा राणे, मनोहर गोमारे, नारायण कापोलकर, शुभम शेळके यांचा राहणार आहे.
धर्मवीर अ‍ॅड. संग्रामअप्पा शेटकार व्यासपिठ नथमल शेठ इन्नाणी सभागृहात सकाळी ९ ते १०.३० या वेळेत बालकांचे कथाकथन होणार आहे. अध्यक्षस्थानी धनंजय गुडसूरकर हे राहणार आहेत. परिसंवाद बालवाचन काही उपाययोजना सकाळी १०.३० ते १२ यावेळेत असून अध्यक्षस्थानी रमेश चिल्ले तर सहभाग विद्या बोरसे, तृप्ती अंधारे, वर्षा तोडमल यांचा राहणार आहे.
दुपारी १ ते २ या कालावधीत बाल कादंबरी वाचन होणार असून सादरीकरण श्रीमती मीना सासणे हे करणार आहेत. दुपारी २ ते ३ या वेळेत बालसाहित्तीकांशी संवाद व गप्पा हा कार्यक्रम असून अध्यक्षस्थानी बालाजी मदन इंगळे तर सहभाग संजय वाघ, दत्ता डांगे, भगवानराव अनीकर, विलास सिंदगीकर यांचा राहणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत सुंदर माझी शाळा सादरकर्ते गणेश घुले व संच
शांता शेळके कविकट्टा देवीसिंह चौहाण सभागृहात सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कवीकट्टा सुरु राहणार आहे. सुरेशभट गझलमंच सिवंâदर अली वज्द सभागृहात सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी २ ते ५ या कालावधीत गझलमंच सुरु राहणार आहे.
डॉ.ना.य.डोळे व्यासपिठ छत्रपती शाहू महाराज सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत साहित्य संमलेनाच्या समारोपाचा समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी भारत सासणे राहणार असून वेंâद्रियमंत्री नितीन गडकरी, खासदार सुधाकर शृंगारे यांची यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष आमदार संभाजी पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार धिरज देशमुख, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष माजी आमदार मनोहर पटवारी, रामचंद्र काळुंखे, कार्यवाह दादा गोरे, श्रीकांत मध्वरे, महादेव नौबदे, मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर, समन्वयक रमेश आंबरखाने, डॉ.आर.आर.तांबोळी आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]