27.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसांस्कृतिक*उद्यापासून सोलापूरच्याअँम्फी थिएटर मध्ये दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी*

*उद्यापासून सोलापूरच्याअँम्फी थिएटर मध्ये दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी*


सोलापूर,(प्रतिनिधी):–  दिवाळीपूर्व विचारांची मेजवाणी देणारे विवेकाची अमृतवाणी 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 6.25 वा. लोकमान्य टिळक सभागृह चार पुतळा समोर (हि.ने. वाचलनालय  अँम्फी  थिएटर) येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्यावतीने हा कार्यक्रम असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्यवाह प्रशांत बडवे यांनी दिली. यंदाचे हे तेरावे वर्ष असून तीन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा सोलापूकरांना ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या वाणीतून प्रभु श्रीरामाच्या सानिध्यातील व्यक्तीरेखां उलगडल्या जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी पु. ना. गाडगीळ अॅन्ड सन्स यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.


 पहिल्या दिवशी शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर रोजी श्रीराम स्नेही-निषादराज, दुसऱ्या दिवशी शनिवार दि.4 नोव्हेंबर रोजी श्रीराम सेवक- केवट तर समारोपाच्या दिवशी रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी श्रीरामभक्त – शबरी यांचे जीवन उलगडण्याचा प्रयत्न करणार आहेत. भक्ती, स्नेह आणि सेवा या तिहेरी संगमातून यंदाच्या विवेकाची अमृतवाणी मधून विचारांची मेजवाणी घेता येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पु.ना.गाडगीळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोफत सर्वासाठी खुला असणार असून वेळेवर सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुरू होवून 7.30 वाजता संपणार आहे. रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने आणि वेळेवर येवून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन जितेश कुलकर्णी, अमोल धाबळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]