आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची आपल्या नेत्याला सामाजिक कार्यातून शुभेच्छा
निलंगा-(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा शहरात डाॕक्टर असोशियसनच्या वतीने चौदाशे तिस रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले. माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवा दिन साजरा केल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दिनांक २२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जोपासत माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा शहरातील गरीब व गरजू लोकांची सेवा घडावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर आसोशियसनचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यातून ईनामवाडी वडार वस्ती,तसेच शहरातील सर्वच खाजगी वैद्यकीय रूग्णालयात सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.तसेच रूग्णांची बाह्यरूग्ण विभाग तपासणी करण्यात आली आहे.शहरातील जवळपास ६० डॉक्टरांनी चौदाशे तिस मोफत बाह्यरूग्ण तपासणी केली आहे.यामुळे गरीब व गरजू लोकांची सेवा या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून झाली आहे.याचा लाभ गरीब गरजू लोकांना झाल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी डॉ श्रीधर अहंकारी,डॉ तात्यासाहेब देशमुख,डॉ लालासाहेब देशमुख डॉ किरण बाहेती,डॉ प्रमोद हातागळे,डॉ दत्ताञय अरीकर,डॉ सौ,वैशाली हातागळे,डॉ सुफीया पटेल,या डॉक्टरांनी सर्वरोग निदान शिबिरामध्ये रूग्ण तपासणी केली.
उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना शहर भाजपाच्या वतीने फळे वाटप….
निलंगा शहरातील उपजिल्हा रूग्णालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे,शहरध्यक्ष विरभद्र स्वामी,मनोज कोळ्ळे,ज्ञानेश्वर बरमदे,प्रदिप पाटील,विष्णू ढेरे,शफीक सौदागर,अप्पाराव सोळुंके,मंचक पांचाळ,रवि कांबळे,शंकर भुरके,पदमाकर पांचाळ,पिंटू पांचाळ,महेश धुमाळ,पाशामियाँ अत्तार,सुमित इनानी,विकास पटणे,बंटी देशमुख ,सचिन गायकवाड ,योगेश गाडीवान,विजय होगले,बालाजी दंडगुले,काशीनाथ दंडगुले,राच्चापा दंडगुले,गुंडाप्पा दंडगुले,सोमनाथ जाधव,आंबादास बिजापूरे,आदी निलंगा शहरातील पदाधिका-यांनी उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून साजरा केला.