17.8 C
Pune
Wednesday, December 17, 2025
Homeलेख*' उमेद संकल्प '*

*’ उमेद संकल्प ‘*

बारा वर्षांच्या सुजीत ची विष प्राशन करून त्याच्या राहत्या घरी आत्महत्या’
आत्महत्येचे कारण अद्यापही कळले नाही.

आमच्या या सुजीतला उमेद संकल्प कडून भावपूर्ण श्रद्धांजली ‘

‘ मन हेलावून टाकणारी घटना ‘ आगरगाव पारधी बेडा वय वर्षे बारा प्रकल्पातील सुजीत, कोरोना काळात घरी पाठवलेला. पण परत मुलं प्रकल्पात आली म्हणून तोही त्यांच्या मामासोबत परत आला. काही महिने राहिला नंतर एक दिवस ‌आई वडील आले खुप गोंधळ घालत फालतु कारणं सांगुन बळजबरीने त्याला घेऊन गेले. बघता बघता वर्ष संपलं त्याची शाळेत अॅडमिशन असल्याने खुप वेळा विचार केला कि त्याला घेऊन यावे पण प्रकल्पातील कामामुळे त्याच्या गावाकडे जायला तसा वेळ मिळाला नाही. तसं नेहमी त्याची माहिती त्याच्या मामा कडून कळत होती.


सुजीत हा खुप कमी वयात दारुचा व्यवसाय करायला शिकला होता. घरातील दारु तर काढायचाच पण बाहेर ची इंग्लिश दारू सुद्धा विकायला आणायचा. हे सगळं करतांना त्याला जुगार खेळायचा सुद्धा शौक लागला. अतिशय व्यसनी ,जुगार खेळणारा , वाया गेलेला असा त्याच्या आईवडिलांनी तयार केले.
ज्या वयात शाळेचा आनंद घ्यायचा होता तेव्हा तो दारू, जुगार, याचे धडे घेत होता. शाळेचे दिवसच त्याच्या आईवडिलांनी हिरावून घेतले. खुपदा सांगुन त्याच्या आईवडिलांनी ऐकले नाही. वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा प्रकल्पात आणायचा प्रयत्न केला पण तो इतका वाईट मार्गाला लागला होता कि, त्याला बाहेर काढणे अशक्य होऊन बसले. कठिण झालं होत सगळं…

अतुल माझ्या सोबत पुण्यात आला येतांना खुप वेळ गप्पा झाल्या त्यात सुजित ला परत प्रकल्पात घेऊन जायचं हे ही ठरलं …आणि पंधर दिवसांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असा निरोप मिळाला. एक सेंकदासाठी काय बोलू काही सुचलंच नाही. इतका छोटा तो, ‘ या वयात तर आई जेवन भरविते हो , या‌ वयात अवतीभवती आईवडील असतात , किती काळजी घेत असतो आपल्या मुलांची..

पण सुजीत बघा वयाच्या आठ – नऊ वर्षाचा असतांनाच जगण्याची धडपड शिकत होता. व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याला बाहेर काढायला त्यानें कुणाला वेळच दिला नाही. आणि नाहीच जगता आलं तर शेवटचा पर्याय त्याने आत्महत्येचा शोधला. अद्याप ही त्याच्या आत्महत्येचे कारण कळु शकले नाही.

आता फक्त उरल्या त्या आठवणी आठवणी.. माझ्या कडे आला तेव्हापासून च्या खुप आठवणी साठवल्या. त्याचं बचपण प्रकल्पात गेलं, माझ्या नजरेत कैद झालं…माझ्या सोबत , प्रकल्पातील मुलांसोबत कितीतरी मस्तीचे क्षण आहे त्याचे, अशी एक आठवण देऊन गेला सुजीत..!!

अश्या कित्येक घटना या पारधी वस्तीत होतात. आणि सर्व घटना शक्य तोवर चौदा वर्षांच्या आतील असतात. काही महिन्यांपूर्वी पुर्वी एका मुलिने फाशी घेतली. या दोन वर्षात हि चौथी केस आहे आत्महत्या करायची. आतापर्यंत मी अश्या घटना कधी पोस्ट केल्या नाही. पण सुजीत सोबतचे मला सांगण्यासाठी भाग पाडले. ‘ मी सुजीत ला नाही वाचवू शकले पण दुसरा सुजीत नक्कीच नाही होऊ देणार यासाठी खुप प्रयत्न करेल’.

एक पाऊल पुढे करत त्याची छोटी भावंड शिक्षणाच्या प्रवाहात यावी यासाठी त्याच्या आईची भेट घेतली. लवकरच त्याची भावंड प्रकल्पात येईल.

या मुलांनवर, या समाजातील लोकांन वर जमेल तेवढ काम करायचं आहे. जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच सहकार्याची गरज आहे. हिच विनंती..!

लेखन:
मंगेशी मून रोठा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]