सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी साखर कारखान्यांनी यंत्रणा वाढवून ऊसाचे वेळेवर गाळप करण्याच्या केल्या सुचना
लातूर : दि. १४ जानेवारी २०२४
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना व रेणा सहकारी साखर कारखाना यांनी गळीत हंगामातील उर्वरीत ऊसाचे लवकर लवकर गाळप करण्यासाठी अधिकची यंत्रणा वाढवून ऊसाचे गाळप वेळेवर करण्याच्या सुचना दिल्या.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परीवारातील यावर्षीचा सर्वच कारखान्याचा गळीत हंगाम अधिक क्षमतेनी चालविण्यासाठी चांगली तयारी केली. यासाठी लागणारी आवश्यक तोडणी – वाहतूक यंत्रणा सज्ज केली. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. पावसाने मध्येच मोठा खंड दिला होता. पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाची वाढ झाली नाही. एकरी कमी उत्पादकतेचा अंदाज होता. मात्र नोव्हेबर – डिंसेबर २०२३ नंतर परतीचा पाऊस पडला. या पावसामुळे ऊसाला फायदा झाला ऊसाचे एकरी उत्पादनही वाढल्याचे दिसून येत आहे. पण याकाळातील अवकाळी पावसामुळे काही काळ गळीत हंगामास व्यत्यय आला. सदया हंगाम गतीने सुरू आहे मात्र कारखाना क्षमता अधिक असून यासाठी अधिकची यंत्रणा लागत आहे. ही परिस्थिती पाहता या हंगामासाठी उर्वरीत राहीलेल्या ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी अधिकची यंत्रणा वाढवून ऊसाचे लवकरात लवकर गाळप करावे अशा सुचना कारखाना प्रशासनाला दिल्या आहेत.

सदया तापमान वाढत असून पाण्याचे दुर्भीष्य जाणवत आहे. खरीप आणि रब्बीतील कोणत्याच पिकाला भाव नाही. यामुळे सभासद व ऊसउत्पादक शेतकरी आपल्या ऊसाची लवकर ऊसतोडणीसाठी प्रयत्न करीत आहेत. सुरू असलेला गळीत हंगाम वाढू नये सर्व उर्वरीत उसाचे गाळप वेळेवर व्हावे या अनुषंगाने सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कारखान्याकडील आहे त्या यंत्रणेची कार्यक्षमता दुप्पट वाढविण्याच्या सुचना कारखाना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच अन्य कारखान्याकडील यंत्रणा घेऊन येथील यंत्रणा वाढवली आहे. या वाढलेल्या यंत्रणेमुळे ऊसाचे वेळेवर गाळप होईल.
लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी
गळीत हंगामाची वाटचाल आणि ऊसतोडणी कार्यक्रमाची घेतला आढावा
उर्वरीत ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी
यंत्रणा वाढविण्याच्या केल्या सुचना
लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूर तालुका, रेणापूर तालुका आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे या अनुषंगाने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखानाच्या ऊसतोडणी व ऊसवाहतूक यंत्रणेची आणि सुरू असलेल्या गळीत हंगामाचा आढावा घेतला.
जानेवारी महीना सुरू असून पाण्याचे दुर्भीष्य, वाढते ऊन यामुळे सभासद आणि ऊसउत्पादक आपला ऊस लवकर जाण्यासाठी कारखान्याकडे मागणी करीत आहेत. या अनुषंगाने लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सुरू असलेल्या गळीत हंगाम वाटचालीची व सर्व यंत्रणेची माहीती घेतली. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि ऊसउत्पादकाच्या उर्वरीत ऊसाचे गाळप लवकरात लवकर व्हावे या अनुषंगाने त्यांनी सर्वच कारखान्याकडे या भागात अधिकची यंत्रणा वाढविण्याच्या सुचना कारखाना प्रशासनाला केल्या आहेत. या भागात अधिक यंत्रणा वाढवून ऊसाचे गाळप लवकर करण्याच्या सुचना आमदार देशमुख यांनी केल्या आहेत.
—