यशोगाथा
आपण शेतात इमारती उगवल्या आणि आता इमारतींच्या गच्चीवर सेंद्रिय शेती करत आहोत…
पण आजकालच्या या दिखाऊ जमान्यात एक आधुनिक तरुण शेती करताना दिसत आहे..
त्या आधुनिक शेतकऱ्याचे नाव आहे.
“श्री चेतन मिलिंद बेळगावकर” वयाने फक्त 35 वर्ष.
एका नामांकित कंपनीमध्ये HR डिपार्टमेंट मध्ये काम करत असलेला एक तरुण अचानक शेतीमध्ये काम करताना दिसू लागला आणि बघता बघता त्यांची ऑरगॅनिक शेती , पोल्ट्री फार्मिंग नावारूपास येऊ लागली….

प्रवास सोपा नक्कीच नव्हता किंवा नाहीये.
दिवसभर एअर कंडिशन मध्ये काम करण्याची सवय आणि आता 12,12 तास उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात काम करणं हे काही सोपं नक्कीच नाही.
श्री चेतन बेळगावकर मध्यमवर्गीय कुटुंबातील एक अतिशय हुशार असा मुलगा. एका नामांकित साॅफ्टवेअर कंपनी मध्ये काम करत असताना कुठेतरी ओढ मातीकडे थोडक्यात शेतीकडे ओढली जात होती.

पण संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना नोकरी का शेती यामध्ये घालमेल चालली होती.. नोकरी सारखे सुरक्षित ठिकाण सोडून काहीतरी वेगळा मार्ग अवलंबताना घरातून ,नातेवाईकांकडून जवळजवळ विरोध झाला होता … शेती करणे हे आपल्या सारख्यांचे काम नाही आणि मराठी माणूस हा मागे पडतोय मागे पडतो अशी ओरड करणारे आपणच एका मराठी माणसाला वेगळं काही करताना प्रथम साथ देत नाही.
शेवटी मोठ्या धडाडीने त्याने हा निर्णय घेतला. सॉफ्टवेअर कंपनी मधली नोकरी सोडून.
अर्थातच आर्थिक पाठबळ उभे करताना स्वतःचे राहते घर विकून मोठा धडाडीचा निर्णय घेतला पण कुणाकडेही आर्थिक हात पसरले नाहीत. या धाडसी निर्णयाला अर्थातच साथ दिली त्यांच्या सुविद्य सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या स्नेहल या पत्नीने.. तिचेही करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

मग शोध सुरु झाला तो जागेचा.. त्यातही बर्याच अडचणी आल्या. जागा घेणे हे नक्कीच सोपे काम नाही. जागेच्या व्यवहारात अगदी डोळ्यात तेल घालून कुठे काहीच प्रॉब्लेम तर नाही येणार ना असा विचार करत अनेक ठिकाणी जागा शोधत राहिला.. फसणार तर नाही ना ही भीती पण मनामध्ये अनेकदा येऊन गेली..
पण नशिबाने चांगली जागा “परिंचे”या गावामध्ये मिळाली. आर्थिक तडजोडीसाठी त्याने लांब जाणे पत्करले.. रोजचा जवळजवळ जाऊन येऊन 3 तासाचा प्रवास आहे..
अशा या परिस्थितीत रोज जाऊन येऊन अर्धी माळरान आणि अर्धी बागायती असलेल्या जमिनीवर नंदनवन फुलवयाला सुरुवात केली.. कधी पाण्याची अडचण कधी लाईटचा प्रॉब्लेम पण कधी चतुःसीमांचा प्रॉब्लेम…
या सगळ्यावर मात करत आज हा आधुनिक शेतकरी.. . तरुण पिढीचा एक मोठा आदर्श आहे. सुरुवातीला गीर गाईंचा प्रकल्प करणार होता पण त्यातही बऱ्याच अडचणी होत्या तसेच नंतर गोट फार्मिंग करावे पण त्यातही भरपूर अडचणी .
शेवटी त्यांनी(गावरान) पोल्ट्री फार्मिंग करायचे ठरवले पण त्यावेळेला कोंबड्या तुमच्या तुम्ही पकडून घ्यायच्या असं गावकऱ्यांनी (कोंबडी विकणाऱ्यांनी) सांगितले. त्यांच्यासाठी कोंबडी पकडताना काय हाल झाले असतील याची कल्पनाच करू शकत नाही.. कोंबडीची पिल्ले उबवण्यासाठी लागणारे इनक्यूबेटर त्यांनी स्वतः घरी तयार केले.
तसेच शेतीसाठी लागणारे सर्व सामान स्वतः जाऊन आणणे ,फेंसिंग पासून खड्डे करण्यापर्यंत .नांगरणी ते औषध फवारणी सर्व कामे स्वतः उन्हातानात तासन तास करतो…

पहिल्यांदा आम्हा सगळ्यांना हा वेडा आहे की काय पण एखादे वेड डोक्यात घेतल्याशिवाय ते तडीस नेता येत नाही त्याप्रमाणे.. श्री चेतन यांनी तरुण पिढीला कष्टाने हे दाखवून दिले आहे.. आज त्याच्या शेतातील कुठलेही केमिकल किंवा पेस्टिसाइड न वापरता केवळ जीवामृत आणि शेणखत किंवा बागायती कचरा कडुलिंब तसेच तंबाखूच्या पाण्याच्या फवारणी वरच्या फळभाज्या आणि पालेभाज्या निःशंकपणे घेऊ शकतो ….
असा हा आधुनिक धाडसी तरुण आणि एक मराठी माणूस तरुण पिढीसाठी उत्तम आदर्श… त्याच्या कष्टाला आणि त्याच्या धाडसाला मानाचा मुजरा..
चेतन बेळगावकर
( साभार:फेसबुक)