29 C
Pune
Sunday, March 22, 2026
Homeमहाराष्ट्रएफएसएसएआयच्या वतीने लातूर शहरात आज वॉकेथॉनचे आयोजन

एफएसएसएआयच्या वतीने लातूर शहरात आज वॉकेथॉनचे आयोजन

लातूरः भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमीत्ताने आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत एफएसएसएआयच्या पश्चिम कार्यालयाच्या वतीने एफएसएसएआय- एफबीओ मीट (FSSAI-FBO Meet) व वॉकेथॉन(Walkathon) 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने

(एफएसएसएआय) च्या वतीने शहरात रविवारी(ता. 1 मे) रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून दयानंद महाविद्यालय ते शिवाजी चौक ते दयानंद महाविद्यालय असा या वॉकेथॉनचा मार्ग असणार आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण पश्चिम क्षेत्राचे संयुक्त निदेशक श्री संजीव पाटील यांनी दिली. लातूर शहरवासीयांना उस्फूर्तपणे यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री. दयानंद पाटील, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी श्री. केदारनाथ कावरे, श्री. विघ्नेश्वर थेवर, श्री. लोंढे, तांत्रिक अधिकारी डॉ. राज आंधळे, श्री. हरीश भालेराव उपस्थित होते.

अन्न सुरक्षा जागरूकतेसाठी एफएसएसएआयच्या वतीने वाकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी अधिकारी आणि नागरिक सुरक्षित आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयीचा प्रचार करून स्वावलंबी भारतासाठी योगदान देतील.

अधिक माहितीसाठी संपर्क

केदार कावरेः 9421432113–
Regards,
Manisha S. Meshram.
Aurangabad.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]