विश्वशांतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षण महत्वाचे
माजी आमदार उल्हास पवार यांचे प्रतिपादन
माईस एमआयटीचा ४१वां वर्धापन दिवस उत्साहात साजरा
पुणे, दि.१०ऑगस्ट( वृत्तसेवा)-: शिक्षणाचा बहुअंगाने विकास होत असतांना माईर्स एमआयटी संस्थेने ज्ञान,विज्ञान, अध्यात्म, संस्कृती व मानवता हा मुळ गाभा सोडलेला नाही. विश्वशांतीसाठी मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन येथे नवी पिढी निर्माण केली जात आहे. असे विचार ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार यांनी विचार व्यक्त केले.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचा ४१ वा स्थापना दिवस शनिवारी कोथरूड कॅम्पस मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात आले
या प्रसंगी प्रियदर्शनी अॅकॅडमीचे माजी अध्यक्ष नानीक रुपानी व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, व्यवस्थाकीय समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक व मुख्य संयोजक व युनिस्को चेअर व्होल्डर विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
या प्रसंगी डॉ. विश्वनाथ कराड यांना संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय विधायक परिषद यशस्वी केल्यामुळे राहुल विश्वनाथ कराड यांचाही सत्कार करण्यात आला.
उल्हास पवार म्हणाले, डॉ. कराड यांनी लावलेले बीज आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या संस्थेचे पाच विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य सुरू आहे. संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावाने जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करून विश्व शांतीचा संदेश पोहचविण्याचे कार्य सुरू आहे. सध्या राहुल कराड यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संस्था प्रगतीच्या शिखरावर असून संस्थेचा आलेख प्रगतीपथावर आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, आजचा दिवस आंतरिक समाधानाचा व जीवनातील वेगळी अनुभूती देणारा दिवस आहे. ४१ वर्षापूर्वी केलेल्या संकल्पाला दिशा मिळाली. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला वसंतदादा यांच्यामुळे नवी दिशा मिळाली. ही संस्था ज्ञान विज्ञानाची प्रयोगशाळा आहे.

डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, भारतीय शिक्षण क्षेत्रात देशभरता वेगळी ओळख निर्माण करणारी माईर्स संस्था एक विचारधारा घेऊन वाटचाल करीत आहे. त्याग, प्रयत्न आणि कष्टाच्या जोरावर डॉ.कराड यांच्या मार्गदर्शनात संस्था प्रगतीपथावर आहे. जागतिकरणाच्या वाटेवरील या विद्यापीठाला काळानुसार बदलणे गरजेचे आहे.
राहुल कराड म्हणाले, आजचा दिवस उर्जा देणार आहे. सर्वांनी संकल्प करून शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कार्य करण्यास सज्ज व्हावे. राष्ट्रीय विधायक परिषदेचे आयोजन करून संस्थेच्या माध्यमातून नव्या कार्याची सुरूवात झाली आहे.
मधुकर भावे व नानीक रूपानी यांनी सांगितले की, ही संस्था गुणवत्तेचा शोध घेण्याचे कार्य करीत आहे. संस्थेला अध्यात्माची ताकद मिळाली आहे. वर्तमान काळात पर्यावरणाचा र्हास होतांना दिसत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीचा नाश नक्कीच आहे. अशावेळेस विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती करावी.
या प्रसंगी अधिष्ठात प्रा.शरदचंद्र दराडे पाटील, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, सर्व विभागचे अधिष्ठाता व संचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.
०००००००००००००००००००००००००००००००००००




