जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय द्यावा ; भारतीय जनता पार्टीचा एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-एसटी महामंडळ बरखास्त करून महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करण्यात यावे या मागणीसाठी निलंगा बस डेपो (आगार)मध्ये एसटी महामंडळाच्या शेकडो बंधू-भगिनी कर्मचाऱ्यांनी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंके,तालुकाअध्यक्ष शाहूराज थेटे, ज्येष्ठ नेते दगडूू सोळुंके, भाजपा ओबीसी आघाडीचे नेते नगरसेवक शरद पेटकर,तालुका सरचिटणीस युवराज पवार युवा मोर्चाचे तालुका पदाधिकारी तम्मा माडीबोणे, अर्जुन पौळ, अप्पाराव सोळुंके यांच्या शिष्टमंडळाने एसटी आगारातील उपोषणकर्त्यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व निलंगा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपोषण करत्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देऊन, तात्काळ शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा व त्यांची मागणी मान्य करावी अशा पद्धतीचे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी, कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी कर्मचाऱ्यांचा खांद्याला खांदा लावून न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करेल ,असे अभिवचन भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी दिले. यावेळी उपोषणार्थी कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अनेक वाहक आणि चालकांचे कोविड-19 च्या कालावधीतील वैद्यकीय बिले थकल्याने अगोदरचं अडचणीत असल्याने त्यात वेळेवर पगार होत नसल्यानेही एस.टी.कर्मचारी अडचणीत सापडला आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.तात्काळ प्रशासनातील अधिकार्यांनी ज्यांची वैद्यकीय बिले थकले असल्याने त्यावर त्वरीत बिले अदा करावीत,अशी मागणी एसटीतील वाहक आणि चालकांची मागणी करीत आहेत.
———————————————————————











