लालपरीतील कर्मचार्यांना वेळेवर ना पगार,ना वैद्यकीय बिले मिळतात…
महामंडळाचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने वेतनाचा प्रश्न…
लातूर,-( प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सध्याला आर्थिक नियोजन कोलमडले आहे.परिणामी,अधिकारी,कर्मचार्यांच्या वेतना प्रश्न गंभीर बनला आहे.मार्च २०२० पासून महामंडळाचे आर्थिक चक्र थांबले आहे.माञ,ती इंधनाला महाग आहे.अद्यापही काही लालपरी जाग्यावरच थांबून आहेत.ग्रामीण भागातील ५० टक्के आँपरेशन बंद आहे.परिणामी,यातून आर्थिक नियोजन करणे अवघड झाले आहे.सध्याला लालपरी कर्मचार्यांना वेळेवर ना पगार मिळत आहे ना वैद्यकीय बिले मिळत आहेत.परिणामी,कर्मर्यांची मोठ्या प्रमाणावर परवड सुरूच आहे.
लातूर विभागातील लातूर,उदगीर,अहमदपूर,निलंगा आणि औसा आगारात २ हजार ९०० हजार अधिकारी,कर्मचारीसंख्या आहे.
वैद्यकीय बिले रखडल्याची तक्रार.
महामंडळात कार्यरत असलेल्या अधिकारी,कर्मचार्यांची वैद्यकीय बिले गत अनेक महिन्यापासून रखडली आहेत.अद्यापही त्यांच्या पदरी ही बिले पडली नाहीत.आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
फंड नसल्याने अडथळ्यांची शर्यत…
महामंडळातील अधिकारी,कर्मचार्यांची वैद्यकीय बिले थकली आहेत,हे वास्तव आहे.माञ,त्यासाठी असलेला फंड आपल्याकडे सध्याला उपलब्ध नाही.सध्या आर्थिक अडचण आहे.तात्काळ प्रशासनातील अधिकारी व शासनातील अधिकारी यांनी समन्वय साधून यावर त्वरीत निर्णय घ्यावा,अशीही मागणी कर्मचारी कोरोनाबाधित करित आहेत.
घरात आई-वडील आणि मुलगा आजारी होता.त्यांच्या उपचारासाठी मला पाहुण्यांकडून,मिञांकडून हातउसने पैसे घ्यावे लागले आहे.आता त्या पैशाची परतफेड मी वेळेवर करू शकत नाही.
-एक कर्मचारी.
दोन महिन्यांनंतर पगार…
कोरोनाकाळात महामंडळाची लालपरी अनेक दिवस जाग्यावरच थांबून होती.टप्प्याटप्प्याने प्रवासीसेवा सुरू झाली.
माञ,आर्थिक उत्पन्नाची घडी अद्यापही विस्कटलेलीच आहे.
अशा स्थितीत अधिकारी,कर्मचार्यांना वेतनासाठी शासनाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.
उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा?
पत्नीला कोरोनाची बाधा झाली.त्यासाठी तिच्यावर दीड लाखांचा खर्च झाला.उपचार कर्ज काढून केला.सध्या वेळेवर पगारही होत नाही.अशा स्थितीत आई-वडील,मुलांच्या उपचारावर कोठून पैसा खर्च करायचा?
-एक कर्मचारी
एक कर्मचारी डयुटीवर असताना मला कोरोना झाला
माझी लांबपल्ल्याची डयुटी असताना मला कोरोना बाधा झाली त्यानंतर तब्बल मला तीन ते साठेतीन लाखांच्या घरात वैद्यकीय बिल झाले.हा सर्व खर्च उसनवारीचा होता,.माञ,अद्यापही त्यावर महामंडळाने माझे बिल काढले नाही.त्यावर प्रशासनातील अधिकारी यांनी शासनास पुटअप करून वैद्यकीय बिल अदा करावी,अशी मागणी होताना दिसत आहे.
मला सोपी डयुटी दयावी…
कोरोना कालावधीत त्यांनी लांबपल्ल्याची डयुटी करत असताना त्यांना हा प्रादुर्भाव होता.त्याअनुषंगांनी त्यांनी सतत अधिकारी यांना आर्त हाक करीत असताना माझा स्कोर अत्यंत कमी असताना माझी परिस्थिती मरणापर्यंत जावून ठेपली होती.त्यांनी हा प्रकार डयुटीवर असताना झाल्याचे सांगितले.आता,त्यांना सोपी डयुटी देण्यात यावी,त्यांना खुप अशक्तपणा या कोरोना बाधामुळे झाले आहे.त्यांना त्यांचा श्वास व्यवस्थित घेता येत नाही,व्यवस्थित शौचालयास बसता येत नाही,पोटाचा विकार,अशा अनेक प्रकारच्या व्याध्या त्यांना आहेत.त्यामुळे त्यांचे तात्काळ वैद्यकीय बिल त्यांना देऊन त्यांची अडचण प्रशासनाने सोडवावी,अशी आर्त हाक आहे.
-एक कर्मचारी
—————————————————————
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील पाच जिल्ह्यातील एकूण अधिकारी-२०, कर्मचारी-९०८ वाहक-१०६४ तर चालक ९०८ ऐवठे आहेत.यात,मागील कालावधीत अनेक कर्मचारी कोरोना बाधित होते.आता,त्यांना त्यांच्या इच्छेनुसार डयुटी करण्याची मुभा देण्यात यावी,अशीही मागणी अशक्तपणा असणारे कर्मचारी करित आहेत.त्यांना वेळेवर पगार व त्यांचा वैद्यकीय खर्च बिल देण्यात यावी,अशी मागणी आहे.
———————————————————————











