महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरचे ४ उमेदवारांचा महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय:
लातूर (प्रतिनिधी):- राज्यातील महाराष्ट्र परिचर्या परिषदेची, निवडणूक ९डिसेंबरला म्हणजे निकालाच्या दिवशी चांगलीच गाजली.महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेवर लोकनियुक्त अध्यक्षांसह. सदस्यांची निवड करण्यासाठी,परिषदेने निवडणूक जाहीर केल्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने १६नोव्हेंबर पासून निवडणुकीची मतपत्रिका सर्व पात्र उमेदवारांना टपालाद्वारे पाठविण्यात आल्या व त्या ७ डिसेंबर पर्यंत मतदारांना आपल्या मतपत्रिका पाठविण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या.
मराठवाडा विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र या ६ उमेदवार, नोंदणीकृत अधिपरिचारीका संवर्गाचे, पाठ्ययनिर्देशक व अधिसेविका वर्गातून,प्रत्येकी १ उमेदवार,ट्रेंड्स नर्सेस असोशिएशन या संघटनेकडून एक उमेदवार मतदारांमार्फत निवडून येणार होते,मतदारांनी मतदान केलेल्या मतपत्रिका परिषदेकडे पोहोचल्यानंतर ९ व १० डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतमोजणी झाली.
या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर या शासनमान्य संघटनेच्या वतीने पुरस्कृत मराठवाडा,विदर्भ,व उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही विभागातून ६ उमेदवार या निवडणुकीत उभे राहीले होते..
त्यापैकी मराठवाडा विभागातून संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष श्री अरुण कदम लातूर येथून हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते तर श्रीमती अनुसया सावरगावे-औरंगाबाद, व एका उमेदवारामध्ये अटीतटीची लढत होऊन विजयी झाल्या,विदर्भ विभागातून संघटनेच्या पदावर सदैव सक्रिय असलेले युवानेते , श्री पवन धवड व श्रीमती एकता रंगारी ह्या सुरुवातीपासुनच आघाडीवर होते व प्रचंड बहुमताने विजयी झाले… महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना,मुख्यालय लातूर पुरस्कृत या ४ ही उमेदवारांचे या दणदणीत विजयासाठी राज्यभरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.राज्यातील परिचारिका संवर्गाची एकमेव शासनमान्यताप्राप्त – महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना,मुख्यालय लातूर संघटना व पदाधिकाऱ्यांसाठी हा ऐतिहासिक विजय असून, या निवडणुकीतील यशासाठी विजयी उमेदवारांसह,राज्याध्यक्ष- श्रीमती मनिषा शिंदे,राज्यकार्याध्यक्ष-श्री अरुण कदम राज्यसरचिटणीस श्रीमती सुमित्रा तोटे राज्यखजिनदार श्री राम सुर्यवंशी,राज्य-उपाध्यक्ष श्री शाहजाद बाबा खान, श्री भिमराव चक्रे,श्रीमती मंगला ठाकरे,श्री पांडुरंग गव्हाणे, लातूर जिल्हाकार्याध्यक्ष श्री दिपक सोळंके, यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले











