निलंगा ( प्रतिनिधी ) –
ऐन ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात अंबादास सुग्रीव जाधव व संभाजी खांडेकर यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे यांनी या दोघांची हकालपट्टी केली आहे. अंबादास जाधव व संभाजी खांडेकर यांची भारतीय जनता पार्टी हंगरगा बुथ प्रमुखाची जबाबदारी दिलेली होती. पक्ष हिताचे व पक्ष वाढीसाठी काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात या दोघांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे निलंगा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.