● आपत्तीतून इष्टापत्ती- पद्मभूषण डाॅ.अशोक कुकडे
● कोविड योध्दे डाॅ.सचिन बालकुंदे, डॉ.संगमेश चवंडा, डॉ.धर्मराज दुड्डे यांना
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर वितरीत.
लातूर;ता.२४:शासनाची कोणतीच आर्थिक मदत न घेता लोकसहभागातून लातूर मध्ये स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा रहात आहे ही तर आपत्तीतून इष्टापत्ती ठरली आहे असे उद् गार पद्मभूषण डाॅ.अशोक कुकडे यांनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर वितरण कार्यक्रमात काढले.
डाॅ.अशोक अरदवाड यांच्या संपर्कातून अमेरीकेतील भारतीय डाॅ.अविनाश व हेमा राचमाले यांचे एन राचमाले फाऊंडेशन आणि श्री रमेश लोकरे व स्वाती इलमार यांचे साईकाॅन कंन्सलटंट या संस्थेने कोवीड वर मात करण्यासाठी कांही ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व रूग्णोपयोगी साहित्य लातूरमध्ये पाठवले आहेत या साहित्य वितरण कार्यक्रमात डाॅ.कुकडे बोलत होते यावेळी व्यासपीठावर स्पंदनचे डाॅ.विश्वास कुलकर्णी, बी.बी.ठोंबरे, आरोग्य उपसंचालक एकनाथ माले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख उपस्थित होते.
कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेत किल्लारी ग्रामीण आरोग्य केंद्राने डाॅ.सचिन बालकुंदे यांच्या नेतृत्वात तुटपुंज्या उपलब्ध आरोग्य सुविधा व साहित्याचा वापर करत हजारो कोरोना रूग्णाचे प्राण वाचवले.याबद्दल किल्लारी आरोग्य केंद्रासाठी एक ऑक्सिजन काॅन्संट्रेशन व व्हेटीलेटर तसेच जिवाची पर्वा न करता कोरोना योध्दा होत विशेष रूग्नसेवा देणारे रवि चवंडा मेमोरियल हाॅस्पिटलचे-डॉ. संगमेश चवंडा, आरदवाड हाॅस्पिटल रिसर्च सेंटरचे – डॉ.धर्मराज दुड्डे यांना एक ऑक्सिजन काॅन्संट्रेशन तर स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास दोन ऑक्सिजन काॅन्संट्रेशनचे वितरण या कार्यक्रमात पद्मभूषण डाॅ.अशोक कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सुत्रसंचलन संजय अयाचित, प्रस्ताविक डाॅ.अशोक अरदवाड यांनी केले.स्पंदन ऑक्सिजन प्रकल्पाची माहिती डाॅ.विश्वास कुलकर्णी करून दिली बी.बी.ठोंबरे, आरोग्य उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी मनोगत व्यक्त केले तर डाॅ.राजेश दरडे यांनी अभार मानले.डाॅ.अनुजा कुलकर्णी,डाॅ.वैशाली टेकाळे,श्रीकांत हिरेमठ,शिरीष कुलकर्णी, डाॅ.अजय पुनपाळे, डाॅ. कल्याण बरमदे, डाॅ. दत्तात्रय मंदाडे, अभियंता अतुल ठोंबरे यांची विशेष उपस्थिती होती.











