लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या
ऑक्सिजन प्रकल्पाचे पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण
लातूर,दि.15(जिमाका) राष्ट्रीय आपत्तीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात रुग्णांची ऑक्सिजनची निकड लक्षात घेऊन लातूरकरांनी सामाजिक बांधिलकी ठेवून लोकसहभागातून नृसिंह प्रतिष्ठान,लातूर द्वारा संचलित स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अत्यंत अल्प कालावधीत उभारण्यात आला. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते वासनगाव येथे झाला.

यावेळी पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल, मनपा आयुक्त आमन मित्तल, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, डॉ.विश्वास कुलकर्णी, डॉ. अशोक अरदवाड, लक्ष्मीरमण लाहोटी, शिरीष कुलकर्णी, ॲड. संजय पांडे, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ.अजय जाधव, प्रा.मोटेगावकर, श्रीकांत हिरेमट यांची यावेळी प्रमुख उपसिथती होती.
पालकमंत्री श्री.देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की, ऑक्सिजन प्रकल्प उभारणीत शासन, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, वैद्यकीय क्षेत्र तसेच प्रत्येक लातूरकर नागरिकांचा मोठा सहभाग आहे. लोकसहभागातून निर्मिती झालेला हा प्रकल्प महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प सतत कार्यरत राहण्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर अल्प दरात लातूरकर रुग्णांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करुन प्रकल्प चालू ठेवावा. व या प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या सर्व लातूरकरांचे कौतूक करुन अभिनंदन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. कुकडे म्हणाले की, उत्तम सामाजिक बांधिलकी व तातडीची गरज लक्षात घेवून सामुहिकरित्या केलेले काम लातूरच्या दृष्टीने भूषणावह आहे. शासन व प्रशासन व नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळे कोरोना काळात प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा वर्ग आहे. या वर्गाने पूर्णवेळ रुग्णांच्या सेवेसाठी परिश्रम घेतले त्यांचे हे काम उत्तम असून त्यांनी सामाजिक कार्य समजून एक आदर्श घडवून दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये,यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन प्रत्येक नागरिकांनी कर्तव्य म्हणून केले पाहिजे,असेही डॉ. कुकडे म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कोरोना कालावधीत शासन व प्रशासनाने केलेल्या कार्याचा आढावा सांगून वैद्यकीय बाबतीत आलेल्या अडचणी आणि लातूरकरांनी आपत्तीच्या केलेली सांघिक कामगिरी पाहून कोरोनावर मात करु शकलो. लातूरकरांनी दिलेला प्रतिसादाबद्दल कौतूक केले.तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी गर्दीत जाणे टाळा, मास्क् वापरावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले. यावेळी महापैर श्री. गोजमगुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रकल्प उभारणीत विशेष योगदान देणारे राहूल व स्मिता इगे, अतुल ठोंबरे, बसवेश्वर थलकरी व रवि ढोले, निता कानडे, साक्षी कुलकर्णी, डॉ. अनुघा राजपूत, डॉ. संतोष कुलकर्णी, विनय दिक्षीत, संजय आयचित, अविनाश पाटील, इंजि. सतोष कुलकर्णी, सुनिल देशपांडे, भूषण दाते, दत्ता शिंदे, सोमनाथ हुमनाबादे, अमोल बनाळे यांचा पालकमंत्री देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. विश्वास कुलकर्णी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला असून प्रति दिन 80 सिलेंडर निर्मिती होते, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकूंद भिसे यांनी केले तर आभार अतुल ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवट डॉ.अनुजा कुलकर्णी यांच्या पसायदानाने झाला.
*****











