लातूररात ओबीसी,भटक्या विमुक्तांचा महामेळावा
पंकजाताई मुंडे, प्रभू चव्हाण, राम शिंदे, निलंगेकर आदी मान्यवर येणार
लातूर दि.१३ – भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी लातूर येथे 14 ऑगस्ट 2021 रोजी भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ओबीसी भटक्या विमुक्तांचा महाजागर महामेळावा होत असून या मेळाव्यास जिल्हाभरातून हजारो समाजबांधव सहभागी होणार आहेत. या महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अनेक जण मेहनत घेत आहेत.
![]()
राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्याने मराठा, ओबीसी समाजाला मिळलेले आरक्षण रद्द झाले. या समाजाला आरक्षण मिळावे ही भाजपाची भूमिका असून घटनेने दिलेले ओबीसीच्या हक्काचे राजकीय आरक्षण सन्मानाने परत मिळावे यासाठी आणि आरक्षणाबाबत जनजागृती व्हावी याकरीता लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने शनिवार रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय, जुनी रेल्वे लाईन, बार्शी रोड येथे ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महामेळाव्याचे उद्घाटन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास कर्नाटक राज्य सरकारचे पशुसंवर्धन मंत्री ना. प्रभुजी चव्हाण, राज्यातील माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. अतुल सावे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. तुषार राठोड, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लातूरात होणारा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा महाजागर महामेळावा ऐतिहासीक व्हावा यशस्वी व्हावा यासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. खेड्यापाडयात वाडी वस्तीत राहणाऱ्या ओबीसी समाजातील विविध जातीतील समाज बांधव या महामेळाव्यात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सदरील महाजागर महामेळाव्यास जिल्हाभरातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीतील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, सांस्कृतिक सेलचे प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, रामचंद्र तिरूके, त्र्यंबकआबा गुट्टे, अशोककाका केंद्रे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष गोविंद चिलकुरे, मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड, शहर जिल्हाध्यक्ष देवा गडदे, जिल्हा प्रभारी गोरोबा गाडेकर, ज्ञानेश्वर चेवले, प्रा. विजय क्षिरसागर, भागवत सोट, दिलीप धोत्रे, देविदास काळे, बाबु खंदाडे, बाळासाहेब शिंगाडे, अभिषेक आकनगीरे, सुरेश पवार, पृथ्वीसिंह बायस, शैलेश स्वामी, सुनिल मलवाड, वसंतराव डिघोळे, सुरेंद्र गोडभरले, विजय काळे, सतिष अंबेकर, बालाजी गुटे, रवि सुडे, काकासाहेब चौघुले, शिवसिंह सिसोदिया, वसंत करमुडे, प्रशांत पाटील, काशिनाथ ढगे, राजकुमार राजारूपे, अजय भूमकर, दत्ता चेवले, राजकुमार परदेशी, सचिन मदणे, गोविंद नरहरे, यांच्यासह अनेकांनी केले आहे.
![]()











