ओबीसी जागर मेळावा

0
217

 

सर्वपक्षीय ओबीसींचा २४ जुलैला लातूरात जागर मेळावा

स्थानिक स्वराज संस्थामधील आरक्षण पुन:स्थापीत होण्याकरीता जनआंदोलन उभारण्याचा निर्धार.

राज्यभरातील समन्वयक राहणार उपस्थित

लातूर/प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित केले आहे. याचा फटका समाजातील ५६ हजार लोकप्रतिनिधींना बसणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे या मागणीसाठी लातूर ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शनिवार दि.२४ जुलै रोजी लातूर येथे ओबीसींचा जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून आरक्षण पुनर्स्थापित करण्या संदर्भात जनजागृती केली जाणार असल्याची माहिती कृती समिती सदस्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या मेळाव्यासाठी राज्यातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द ठरले आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा न्यायालयात जमा न केल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३४ जिल्हा परिषदा, नगरपंचायती व २८ हजार ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू असून मागील २५ वर्षांपासून मिळत असलेले आरक्षण त्यामुळे थांबले आहे. ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना याचा फटका बसणार आहे.या निर्णयामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा आली असून केंद्र व राज्य सरकारने आरक्षण पूर्ववत करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

यासंदर्भात सरकारवर दबाव आणण्यासाठी,ओबीसी जनजागृती करून आंदोलन उभारण्यासाठी शनिवार दि.२४ रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.सकाळी ९:३० ते दुपारी १ या कालावधीत सावेवाडी येथील शाम मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.ओबीसींच्या प्रश्नावर चिंतन करून पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात ठरवण्यात येणार आहे.

या मेळाव्यास राज्यातील व्ही जे एन टी ओबीसी जनमोर्चा सर्व समन्वयक उपस्थित राहणार आहेत मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य ॲड. अण्णाराव पाटील हे भूषवणार असून उद्घाटक लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे,आ.रमेशअप्पा कराड, आ.राजेश राठोड, माजी आमदार वडकुते, व्ही जे एन टी ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष बाळासाहेब सानप, अनिल खरमाटे, ईश्वर बाळबुधे, बालाजी शिंदे, नारायण मुंडे, जि.प.चे सभापती गोविंद चिलकुटे, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, रेणापूर नगरपंचायतचे उपाध्यक्ष अभिषेक आकनगिरे, अहमदपूरच्या उपनगराध्यक्षा मीनाक्षी रेड्डी, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, लातूर मनपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते ॲड.दीपक सूळ, स्थायी समिती सभापती दिपक मठपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांची उपस्थिती राहणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, समाज संघटना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समिती द्वारे करण्यात आले.

यावेळी बोलताना ॲड.अण्णाराव पाटील यांनी कोर्टाच्या निर्णयाने ओबीसी समाजातील सर्व ३७० जाती तीव्र भावनेने एकत्र आल्या असल्याचे सांगत यामुळे राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले.

जागर मेळावा पूर्व तयारी बैठकीस आरक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक ॲड.गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, नगरसेवक राजा मणियार, वेंकट वाघमारे, विजयकुमार साबदे, आयुब मणियार, सौ. सपना किसवे, प्रा. धनंजय बेडदे, प्रा. महादेव बरुरे,अविष्कार गोजमगुंडे, राजेश खटके, प्रा. एकनाथ पाटील, अजित निंबाळकर, व्यंकटेश पुरी, अशोक मलवाडे, पद्माकर वाघमारे, सुदर्शन बोराडे, श्रीनिवास अकानगिरे, श्रीकांत मुद्दे, दगडूसाहेब पडिले, सुरज राजे, अजित निंबाळकर, रंगनाथ घोडके, अजीज बागवान, असिफ बागवान, ॲड प्रदिपसिंह गंगने, तर सौदागर, हमिदपाशा बागवान, विशाल चामे, सुरज कोल्हे, विजय टाकेकर, अनंत चौधरी, संजय क्षीरसागर, प्रमोद पांचाळ, इस्माईल फुलारी, शिवाजी पन्हाळे, अनिरुद्ध येचाळे, एच जी निंबाळकर, विजय खोसे, कल्याण पाटील, महादेव माडगे,उमेश कांबळे, अमोल बुरबुरे, व्ही एच केदार, यांच्यासह सर्वपक्षीय ओबीसी नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

चौकट….

मान्यवरांना निमंत्रण…

या मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे मान्यवर नेते ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.

चौकट

जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा. – महापौर विक्रांत गोजमगुंडे.

ओबीसी आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्याकरिता लातूर येथे आयोजित करण्यात आलेला जागर मेळावा हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय व सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येत या मेळाव्याचे आयोजन करीत आहेत. जागर मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय हक्कांना वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here