औद्योगिक कार्यशाळा

0
424

*नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. दूध प्रक्रिया विभाग येथे औद्योगिक कार्यशाळा*     

कळंब (रांजणी) दि. २७ जुलै रोजी पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय यांच्या वतीने एनर्जी ऑडिट आणि कॉन्झर्वेशन या विषयावरती औद्योगिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. समन्वयक एस.जी. ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर मुख्य मार्गदर्शक होते. औद्योगिक क्षेत्रात वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने या क्षेत्रांमध्ये वीज संवर्धन महत्त्वाचे ठरते. विविध बाबी समजून घेण्यासाठी एनर्जी ऑडिट केले जाते. यामध्ये वीज गळतीचे प्रमाण अपव्यय अंतर्गत योजनेमधील दोष (हार्मोनेक्स इत्यादी), कार्यक्षमता या बाबींचा अंतर्भाव आहे. हा एक ऊर्जा व्यवस्थापनाचा भाग असल्याने आवक, वापर आणि उपयुक्तता यांचा सांगोपांग अभ्यास केला जातो. वीज वापराचा योग्य लेखाजोखा म्हणूनच याकडे पाहिले जाते. औद्योगिक उत्पादनांमध्ये वीजेचा काटकसरीने वापर झाल्यास आपोआपच उत्पादन खर्च कमी करता येतो. वाढत्या वीजेच्या दरवाढीमुळे ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचे खमितकर यांनी कार्यशाळेत मत व्यक्त केले. औद्योगिक कार्यशाळेत अभियंता, तांत्रिक ऑपरेटर इतर कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले चांगला प्रतिसाद मिळाला. लोकजागृतीचा माध्यमातून प्रत्येकाने एक युनिट विजेची बचत केली तर राष्ट्राची दोन युनिटची बचत होते – याविषयी खमितकर यांनी मार्गदर्शन केले. “ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी’ असा संदेश या वेळी देण्यात आला. पारंपरिक इंधन संरक्षण भित्तीपत्रके मान्यवरांच्या हस्ते परिसरात अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सक्षम प्रतिज्ञेने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here