निलंगा-(प्रतिनिधी )निलंगा तालुक्यातील निटूर येथे औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी निटूर येथील जि.प.प्रशाला शाळा,छञपती शाहु ज्युनिअर विद्यालय,महाराष्ट्र विद्यालय येथे अचानक सदिच्छा भेट घेऊन आढावा घेतला आहे.
सदिच्छा भेटीदरम्यान आ.विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या अडीअडचणीवर भाष्य करत असताना मी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोराञ प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.त्यांचा जि.प.प्रशाला शाळा,छञपती शाहू ज्युनिअर विद्यालय,महाराष्ट्र विद्यालयाकडून यथोचित सत्कार करण्यात आला आहे.

जि.प.प्रशाला शाळेत आ.विक्रम काळे यांनी शाळा बोलकी असल्याने बाहेरील आणि आतील बाजूस रंगरंगोटी आणि सजावट केल्याने ते भारावून गेले तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृृंध्दांची स्तुती केली.तसेच तिन्ही शाळेंचा आलेख पाहुन आ.काळे यांनी समाधान व्यक्त केले.शाळेसंदर्भातल्या अडीअडचणी मी विधानसभेत मांडेन असे सांगितले.
एकंदर शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ,छञपती शाहु ज्युनिअर विद्यालयाचे प्राचार्य अनिल सोमवंशी व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड,सोनटक्के बब्रुवान,चवरे,प्रा.संतोष सोमवंशी,सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकरराव निटूरे,राजाभाऊ सोनी,वडगाव शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पाटील,भोयबार सर,राजकुमार निटूरे,उत्तम नागभूजंगे,सिध्देश्वर हासबे,जाधव मॅडम,दिलीप देशमुख आदी होते.




