27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*औशाच्या जनता दरबारातून मिटला राज्यातील महिला बचत गटांचा प्रश्न….!*

*औशाच्या जनता दरबारातून मिटला राज्यातील महिला बचत गटांचा प्रश्न….!*

आ अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने अंगणवाडी आहार पुरवठा ई टेंडर प्रक्रिया रद्द 

औसा -( वृत्तसेवा )औसा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांचे प्रश्न सुटत असतात यामुळे या जनता दरबाराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना या जनता दरबारातून राज्यातील महिला बचत गटांचा प्रश्न मिटला आहे.

औसा तालुक्यातील राजमाता जिजाऊ महिला बचत गट संघटनेच्या वतीने (दि.१८) जून रोजी च्या जनता दरबारात मागील दिवसात अंगणवाडी आहार पुरवठा हा बचत गटाच्या माध्यमातून पुरवला जात होता तरी त्याचे e टेंडर भरण्यात येत होते व ही टेंडर मुळे हजारो महिलांचे नुकसान होणार होते. तरी ई टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचे निवेदन दिले व अवघ्या काही दिवसात आ अभिमन्यू पवार यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून ई टेंडर प्रक्रिया रद्द करून महाराष्ट्रातील हजारो महीला भगिनींनचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला आहे.

याबाबत राज्याचे महिला व बाल विकास विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर यांनी अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार पुरवठ्याच्या अनुषंगाने बचत गटाच्या मागण्या उच्चस्तरीय समितीपुढे सादर करण्यात यावेत असे निर्देश असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्व निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

                         औसा येथील या जनता दरबारात औसा तालुक्यातील राजमाता जिजाऊ बचत गट संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनीता महेश सुर्यवंशी, उपाध्यक्षा शालूबाई वसंत मोतीबने, सचिव उषा नागनाथ भोजने यांच्यासह महिलांनी यांनी सन २००७ पासुन आजरोजीपर्यंत औसा तालुक्यातील करजगाव येथील अंगणवाडीत नियमित खंड न पडू देता विना तक्रारी गरमताजा बाला पोषण आहार नियमित पुरवठा केलेला आहे. सदर कार्यकाळात अंगणवाडी सेविका मदतनिस संपावर गेल्या असता आम्ही बालपोषण आहार पुरवण्यात कोणताही कसुर न करता बाल पोषण आहार चा नियमित पुरवठा चालु ठेवलेला आहे. तरी तालुक्यातील बचत गट सध्या चालु असलेल्या गरमताजा बाल पोषण आहार नियमित करावा व आमच्या बचत गटास कायम स्वरुपी सेवा प्रदान करण्यात यावी तसेच यापुढील ज्या बचत गटामार्फत आहार पुरवठा खंडीत झाला आहे त्या नविन बचत गटास आहार पुरवठा करण्यात यावा यापुढे १ ते ३ व ३ते ६ वयोगटातील लाभार्थी पुर्वीसारखे आम्हालाच देण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे आ अभिमन्यू पवार यांच्याकडे केली होती. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा करीत २००७ पासून महिला बचत गट मार्फत अंगणवाडी आहार पुरवठा करणार्‍या महिला भगिनींनचा प्रश्न मिटवला आहे. मागील दिवसात अंगणवाडी आहार पुरवठा हा बचत गटाच्या माध्यमातून पुरवला जात होता तरी त्याचे e टेंडर भरण्यात येत होते व ही टेंडर मुळे हजारो महिलांचे नुकसान होणार होते. तरी औसा विधानसभा मतदारसंघातील महीला बचत गटाच्या महिला भगिनीं १८ जुन रोजी जनता दरबार मध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या कडे ई टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी निवेदन दिले व अवघ्या काही दिवसात शासनदरबारी पाठपुरावा करून ई टेंडर प्रक्रिया रद्द करून महाराष्ट्रातील हजारो महीला भगिनींनचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला आहे. 

                  एकंदरीत औसा मतदारसंघातील जनता दरबारात मतदारसंघातील शेकडो प्रश्न मिटवण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे.एकाच व्यासपीठावर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ऐकून जागेवरच त्या समस्यांचे निराकरण केले जाते तर काही क्लिष्ट विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या माध्यमातून महिनाभरात ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो आशा या जनता दरबारातून महिला बचत गटाचा हा प्रश्न केवळ औसा मतदारसंघासाठी नाहीतर संपूर्ण राज्यातील महिला बचत गटांना दिलासादायक ठरणारा आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]