*औसा पँटर्नची राज्यभर अंमलबजावणी*

0
252

शेतरस्त्यांच्या औसा पॅटर्नची आता राज्यभर अंमलबजावणी होणार.. 

आ. अभिमन्यू पवार यांनी मानले सरकारचे आभार..

औसा,-(प्रतिनिधी) – औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून देण्यासाठी मागच्या वर्षीपासून आ. अभिमन्यू पवार हे मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियान राबवत आहेत. या अभियानांतर्गत शेत रस्त्यांचे मातीकाम आमदार निधीतून करण्यात येते तर खडीकरण व मजबूतीकरण काम मनरेगा योजनेतून करण्यात येते याच पॅटर्नच्या आधारावर राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेनंतर ही दुसरी राज्य पातळीवरील योजना आहे ज्या योजनेला दिशा आणि आकार देण्याचे काम औसा मतदारसंघाने केले आहे.

२७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने मातोश्री ग्राम समृद्ध शेत – पाणंद रस्ते योजना या योजनेला मंजुरी देत राज्यात २ लाख किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांचे काम करण्याचे जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार रोहयो आणि मनरेगा योजनांचे एकत्रीकरण करून शेतरस्त्यांचे काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही योजना म्हणजे आ. अभिमन्यू पवार हे त्यांच्या मतदारसंघात राबवत असलेल्या शेत तिथे रस्ता या अभियानाचे व्यापक रूप आहे. पालकमंत्री पाणंद रस्ते योजना मधून शेत रस्त्यांचे काम करण्यासाठी येत असलेल्या अडचणींचा विचार करून आ.पवार यांनी औसा मतदारसंघात आमदार निधी व मनरेगा योजनेच्या एकत्रीकरणातून शेतरस्त्यांचे काम करण्याची अभिनव कल्पना मांडली. आमदार निधीतून शेतरस्त्यांचे काम कसे करायचे याविषयी प्रशासनात सुद्धा स्पष्टता नसल्याने त्यांनी सुरुवातीला जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून मार्गदर्शक सूचना जारी करून घेतल्या. पहिल्या टप्यात जवळजवळ ७०० किमी लांबीच्या शेतरस्त्यांचे काम पूर्ण झाले असून पुढील २ वर्षात उर्वरित काम पूर्ण करून २२७० किमी लांबीचे शेतरस्ते तयार केले जाणार आहेत. हे अभियान राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रोहयो मंत्री संदीपान भुमरे व रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांची अभिमन्यू पवार यांनी अनेक वेळा भेट घेतली. आ पवार यांनी औसा मतदारसंघात हाती घेतलेले अभियान आता राज्यभर राबवले जाणार आहे. विरोधी पक्षाचा आमदार असूनही सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सकारात्मक प्रभाव पाडण्याची आ. अभिमन्यू पवार यांची ही काही पहिलीच वेळ नाही.

सरकारच्या निर्णयासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी मानले आभार.. 

प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता, मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड, जनावरांसाठी गोठा, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प असे अनेक वैयक्तिक लाभ मिळवून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व शेतकऱ्यांच्या उन्नतीतून ग्रामोन्नती साधायची यासाठी आमदार अभिमन्यू पवार हे मागच्या दिड वर्षांपासून मतदारसंघात काम करत आहेत. आता त्याचीच राज्य पातळीवर होत असलेली अंमलबजावणी मनाला आनंद देणारी असून . सरकारच्या या निर्णयासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत. तसेच शेत तिथे रस्ता अभियानाशी जोडलेले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदनही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here