24.1 C
Pune
Saturday, February 7, 2026
Homeराजकीयकमळ फुलणार, लातूर जिंकणार!

कमळ फुलणार, लातूर जिंकणार!

*भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक विजयसंकल्प सभा..!*

*काय म्हणतंय लातूर कमळ…कमळ…कमळ*

लातूर ; ( माध्यम वृत्तसेवा ):– लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या इतिहासातील भव्य सभा – भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा निश्चय करणारी ‘भव्य दिव्य विजयसंकल्प सभा’ राज्याचे विकासपुरुष देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरात पार पडली. हजारो नागरिकांचा जमलेला जनसमुदाय आणि भाजपच्या जयकाराच्या घोषणेने संपूर्ण परिसर भाजपमय झाले होते.

लातूर शहराच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात भव्य सभा आज पार पडली.राज्य सरकार हे लातूरच्या विकासासाठी कटिबद्ध असून लातूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सातत्याने कार्य करत आहे. यातूनच लातूर-मुंबई एक्सप्रेस वे साकारला जात आहे. या जोडीला आता शहराची आधुनिक व प्रशस्त रस्ते, आरोग्य सुविधा, रोजगार संधी, पिण्याची पाणी, प्रत्येकाला हक्काचे घर, लखपती दीदी अशा असंख्य योजना राबवून शहराचा चेहरा-मोहरा बदलू, असे वचन मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी चाकूरकर यांचे लातूरच्या विकासातील योगदानावर भाष्य करत, त्यांना आपली आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याचा गौरव प्रत्येक लातूरकर आणि राज्य सरकार कायम करत राहील व त्याचाच एक भाग म्हणून शहरात स्व. चाकूरकर साहेबांचे भव्य स्मारक उभारू, असा शब्द त्यांनी दिला. याचबरोबर शहरातील रखडलेली सर्व विकास कामे पुन्हा सुरु करण्यात येतील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७५ फुटी पुतळ्याच्या कार्याला गती देण्यात येईल. तसेच लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीचा रखडलेला प्रश्न तातडीने सोडवून संबंधित कार्य पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, आमदार अभिमन्यू पवार, रमेशअप्पा कराड, अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी खासदार डॉ. सुनील ब.गायकवाड, माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर पाटील, भाजपा प्रदेश सचिव अरविंदजी पाटील निलंगेकर, मराठवाडा विभाग प्रमुख संजयजी कौडगे, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आदींसह सर्व उमेदवार, नवनियुक्त नगराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*स्व. चाकुरकर यांच्या स्मृतीस्थळाची मागणी; आ. निलंगेकर यांच्या राजकीय परिपक्वतेचे दर्शन*

मनपा निवडणुक प्रचाराच्या धामधूमीत मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिवंगत केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मृतीस्थळ लातूर शहर महानगरपालिकेत उभारावे अशी मागणी करीत आपल्या राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. पक्षविरहित राजकारण कसे असावे याचा वस्तुपाठ घालून देताना आपल्या जिल्ह्याची मान उंचावणाºया नेत्याचा योग्य सन्मान व्हावा ही त्यांची भावना मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी त्याच सभेत राज्य सरकारच्या वतीने स्मृतीस्थळ विकसित करण्याची घोषणाच केली.मुख्यमंत्र्यांच्याच शब्दात सांगायचे तर लातूरच्या मातीत नेतृत्व घडविणारे गुण आहेत.

लातूरचे सुपूत्र स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचा नगराध्यक्ष, आमदार, राज्यात उपमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभा सदस्य, लोकसभा अध्यक्ष, विविध मंत्रीपदांसह केंद्रीय गृहमंत्रीपद आणि राज्यपालपदही सांभाळले. एवढे मोठे व्यक्तीमत्व लातूरच्या मातीने देशाला दिले. मृत्यूनंतर या व्यक्तीमत्वाच्या स्मृती जपाव्यात ही आमदार निलंगेकरांची प्रांजळ भावना.राजकारण आज अत्यंत खालच्या पातळीला जात आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखल फेक करीत आहेत. अशा वातावरणात विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्मृतीस्थळ विकसित करण्याची मागणी भाजपाचे आमदार निलंगेकर यांनी केली. पक्षाच्याही पलिकडे जावून त्या व्यक्तीमत्वाचा योग्य सन्मान व्हावा ही त्यांची भावना इथे मोलाची ठरते. विशेष म्हणजे या मागणीत कुठलाही राजकीय स्वार्थ दडलेला नाही. त्यातही विरोधी पक्षाकडून मागणी आलेली नाही. असे असताना निलंगेकरांची ही मागणी जशी स्व. चाकूरकर समर्थकांसाठी आनंददायी ठरली तशीच आ. निलंगेकर यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारणारीही ठरावी.जात-पात-धर्म-पक्ष याच्याही पुढे जात आपल्या जिल्ह्याची मान ज्या व्यक्तीमत्वाने उंचावली त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याची आ. निलंगेकर यांची मागणी मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ मंजूर केली. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या वतीने हे स्मृतीस्थळ विकसित करू असे सांगत त्यांनी स्वत:च्या राजकीय दूरदृष्टीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. निलंगेकर हे तसे पुढच्या पिढीचे नेते. स्व. चाकूरकर यांनी जवळपास पाच दशके राजकीय क्षेत्रात काम केले. याची जाण ठेवत तरुणांचे प्रतिनिधीत्व करणाºया या दोन्ही नेत्यांनी जुना जाणत्या ज्येष्ठ व्यक्तीमत्वाचा सन्मान करावा हे देखील महत्वाचे ठरते. स्व. शिवराज पाटील चाकूरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन व्यक्तिमत्वांच्या मध्ये दुवा ठरत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचे भव्य स्मृतीस्थळ उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार हा लातूरच्या राजकीय पटलावर अत्यंत महत्वाचा निर्णय ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]