38.4 C
Pune
Tuesday, March 24, 2026
Homeमहाराष्ट्रकवयित्री राजमाने यांना पुरस्कार

कवयित्री राजमाने यांना पुरस्कार

लातूर येथील कवयित्री नयन भादुले राजमाने

“श्री हरिहर भूषण” पुरस्काराने सन्मानित

लातूर प्रतिनिधी:

   गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालयात ‘गटराज उत्सव’ मध्ये श्री.हरिहर प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.नयन भादुले-राजमाने ‘साहित्यनयन’ यांना “श्री हरिहर भूषण” पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  यावेळी मंचावर विद्यमान नगरसेवक शैलेशजी स्वामी, वि.प्र.मंडळ सचिव रामेश्वर तिवारी, हरिहर प्रतिष्ठान अध्यक्ष बंसतीबाई जोशी, संस्था सचिव मा. धनराजजी जोशी, प्राचार्य डॉ. सुजाताजी चव्हाण, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.आरेफ शेख,प्रा.नयन भादुले, .महेश राजमाने इ. उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, पालक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

  “श्री हरिहर भूषण” पुरस्काराने सन्मानित केल्या बददल व विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या प्रा. नयन भादुले यांना गेल्याच वर्षीच देविदास जमदाडे राज्यस्तरीय ‘कार्यनिष्ठ शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तसेच श्री. वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने Women’s Empowerment Appreciation Award 2021 ने सन्मानित करण्यात आले व साहित्य जननी कवयित्री शांता शेळके काव्य दर्पण सन्मानाने गौरविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]