निलंगा. ,(प्रतिनिधी ) – जीवनात जगत असताना कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करून जीवनाचा व समाजाचा उद्धार करावा असे प्रतिपादन उमरगा येथील प्रा हनुमंतराव आलूरकर यांनी केले. ते निलंगा येथे हिंदू खाटीक समाज निलंगा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी व समाजभूषण पुरस्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते .
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी निलंगा हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष डॉ प्रमोद हातांगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड प्रदीप सिंह गंगणे, जिल्हाध्यक्ष गणेश कांबळे प्रा हनुमंतराव अलूरकर. प्रसिद्ध साहितयिक तथा गीतकार डॉ संजय जमदाडे व सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गायकवाड पत्रकार नागेंद्र साबणे तसेच शंकर घोने रवींद्र टोम्पे व्यंकट साबणे डॉ वेशाली हातांगळे यांची उपस्थिती होती .
तत्पूर्वी सर्वप्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला समाजाच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण हा पुरस्कार सोलापूर येथील समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र अण्णा गायकवाड व प्रसिद्ध कवी साहित्यकार व गीतकार डॉक्टर संजय जमदाडे यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यत आला अलुरकर म्हणाले की , समाज उपयोगी कार्यक्रमावर भर देऊन समाजातील गुणवंत विद्यार्थी व गुणवान नागरिकांचा सत्कार केल्यामुळे समाज प्रगतीपथावर जात असतो .यावेळी अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड प्रदीपसिंह गंगणे म्हणाले की ,समाज संघटन करताना अडीअडचणीला तोंड देऊन च संघटन निर्माण होत असते . अशा कार्यक्रमातूनच कार्यकर्ता हा घडत असतो विद्यार्थ्यांनी आपापल्या सुप्त गुणांना वाव देऊन समाजाची प्रगती करावी. यावेळी पत्रकार नागेंद्र साबणे म्हणाले की कितीही समाज संघटना उदयास आले तरीही त्यांच्या सोबत राहूनच एकसंघ व्हावे व समाजकार्य करत राहावे व समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करावी समाज एक राहिल्याशिवाय राजकीय सामाजिक शैक्षणिक विकास होऊ शकत नाही .या कार्यक्रमांत बोल ताना पुण्याहून आलेल्या
सौ.सीमा डोंगरे खडके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझे गाव हलगरा असून गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात 2006 मध्ये माझा सत्कार केला गेला होता
लग्नानंतर सासू सासर्यानी आग्रह करून पुढे शिकायला लावले आणि आज मी सेट नेट परीक्षा चांगल्या मार्क घेवून उत्तीर्ण झाले.त्यामुळे. सर्व आई वडिलांनी सासू सासऱ्यानी लग्ना नंतर मुलींचे शिक्षण बंद न करता तिला पुढील शिक्षण घेण्यास प्रवृत्त करा .
सत्काराला उत्तर देताना डॉ संजय जमदाडे म्हणाले की मनुष्य हा आयुष्यात पैसा कमवण्याची परकष्टा करतो तसे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रगती केली पाहिजे अध्यक्षीय समारोप करताना डॉ प्रमोद हातांगळे म्हणाले की समाज संघटन केल्याशिवाय समाजाचा विकास नाही. त्यामुळे ही गरज ओळखून आम्ही गेल्या वीस वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करत आहोत त्यातूनच आम्हाला शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करता येत आहेत. शैक्षणिक विकास झाल्यामुळेच समाजाचा विकास होत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळीसोलापूर,लातूर,उमरगा,उदगीर,औराद, निटूर, पान चिंचोली,बोरसुरी, निलंगा, धाराशिव, हलगरा, सावरी येथील समाज बांधव भगिनी आणि गुणवंत विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रत्नमाला हतागळे आणि *गोरख आर्य यांनी केले .आभार प्रदर्शन विशाखा हतागळे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.प्रकाश डोंगरे,श्री. विक्रम काथवटे,सचिन आर्य,कचरू डोंगरे,अंबादास डोंगरे,विजयकुमार डोंगरे,ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतरावजी साबणे,अशोक जी हतागळे, तानाजी आर्य ई. अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले.