नोटरीज वकील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर मार्फत नरेंद्र मोदी, किरेन रिजिजू यांना निवेदन
—————————————- लातूर दि.१४.१२.२०२१ रोजी महाराष्ट्रातील सर्व नोटरींज वकिल संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या नवीन येणाऱ्या नोटरी कायद्याच्या दुरुस्ती विधेंयकांच्या विरोधात मंगळवार दि.१४.१२.२०२१ रोजी नोटरींचे कामकाज बंद आंदोलन करण्यात आले आहे या लातूर जिल्हयातील कामकाज बंद आंदोलनास १००% प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती अँड संजय सितापुरे यांनी दिली आहे.

केंद्र सरकार च्या नोटरी कायद्यातील प्रस्तावित सुधारनेला विरोध असून सुधारणा विधेयक नोटरी वकील संघटनेला,सदस्यांना मारक ठरणारे विधेयक मागे घेण्यासाठी कामकाज बंद आंदोलन ठेऊन जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, किरेन रिजुजी न्याय व विधी मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे
निवेदनावर महाराष्ट्र नोटरी वकील संघटनेचे उपाध्यक्ष अँड संजय सितापुरे लातूर जिल्हा नोटरी वकील संघटनेचे अँड देवानंद आराध्ये ,अँड अभिजित मगर,अँड डी एच कल्लूरे,अँड बालाजी सिंगापूरे, अँड आर एम फड, अँड वसुधा फड, अँड शालीक गोजमगुंडे, अँड त्रंबक सरदे,अँड दयानंद मिटकरी,अँड रब्बानी बागवान,अँड सुनंदा इंगळे,अँड विकास ढगे, अँड अमर पवार, अँड धनंजय होमकर,अँड सुरेखा गुंडरे, अँड सुनंदा जाधव, अँड गायत्री नल्ले, अँड कल्पना भुरे आदींच्या स्वाक्षऱ्या असून यावेळी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अँड आण्णाराव पाटील, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे आदींची उपस्थिती होती




