जे संत असतात तेच सदबुद्धी भक्तीची भीक देवाला मागतात !
.ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या 25 व्या पुण्यस्मरण सोहळ्यात काशी महास्वामीजींचे आशीर्वचन
अँड शामराव कुलकर्णी यांजकडून
औसा ( गोपाळपूर नगरी )-:-जय संत तपस्वी असतात तेच देवापाशी सद्बुद्धीची व भक्तीची भीक मागतात लोकांच्या उद्धार कल्याणाची तळमळ त्यांच्या हृदयात असते, अशा अद्वैत कुळातील लोक उद्धारक ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या प्रमाणे श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी भागवत संप्रदायाचे अलौकिक कार्य केलेले आहे भगवान शंकर महादेव व पंढरीचा पांडुरंग त्याला असेच बळ देवो त्यांना त्यांचे परिवार व शिष्यासह निरोगी दीर्घायुष्य लाभून या धर्म पिठाची कीर्ती अखंड वाढो असा शुभाशीर्वाद श्री श्री श्री 1008 डॉ.श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला.

सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या 25 व्या पुण्यस्मरण रोप्य महोत्सवी सोहळ्यात श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे धर्मसभेत काशी महास्वामी जी बोलत होते. या धर्मसभेत श्री गोविंद गिरीजी महाराज श्रीक्षेत्र आयोध्या,पं श्री.सुहासजी व्यास, आंबेजोगाई मठाचे षटस्थलब्रम्ह श्री शंभुलिंग शिवाचार्य स्वामीजी नाथ संस्थानचे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर सौ शर्मिलाबाईगुरुबाबा महाराज औसेकर हिरेमठ संस्थांचे श्री चंद्रकांत स्वामी महाराज सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर श्री गोरखनाथ महाराज औसेकर श्री श्रीरंग महाराज श्री ज्ञानराज महाराज यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

लोकांचं भलं करणारा महात्मा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कोणताही वर्णभेद जातीभेद संप्रदाय भेद विरहित सर्वांचे भले व्हावे कल्याण व्हावे असे ज्यांचे मात्र हृदय होते ज्यांनी या गुरु शिष्य परंपरेला आपल्या भक्ती उपासनेच्या द्वारे अलौकिकत्व प्राप्त करून दिले असे भक्तांच्या हृदयात स्थान मिळवणारे ज्ञानेश्वर महाराज ज्यांना आपण आप्पा म्हणतो त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व आयुष्यातील प्रत्येक क्षण शिष्यासाठी खर्च केला व दीपस्तंभ सारखे ज्ञान भक्ती सर्वांच्या हृदयात रुजून ते परमात्म्याच्या चरणी ब्रह्मलीन झाले त्यांचा वारसा श्री गुरुबाबा महाराज औसेकर हे तेवढ्याच निष्ठेने भक्तीने 40 वर्षापासून सांभाळतात त्यांना श्री गहिनीनाथ महाराज हे मोठे पाठीराखे आहेत त्यांच्या बरोबरीने संस्थांचे कार्य व सेवा तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून केलेली निस्वार्थ सेवा यामुळे दोघांची कीर्ती जगतात झाल्याचे गौरवोद्गार काशी महास्वामीजींनी काढले

काशी महापिठाचा व नात संस्थांचा 200 वर्षाहून अधिक काळाचा भक्ती ऋणानुबंध आहे जंगमवाडी मठामध्ये अवसेकर महाराजांनी नाथांच्या पादुकांची स्थापना केली आणि वीरनाथांपासून गुरुबाबांपर्यंत गुरुपरंपरेत अनेक नाथषष्ठी उत्सव काशी क्षेत्रात मोठ्या भक्ती उत्साहात साजरे झाले आहेत.
मूर्ती लहान पण सेवा महान चिरंजीव गितेश्वर महाराजांचे जगद्गुरुनी केले भरभरून कौतुक
.संतांच्या कुळात जन्म घेणे पुण्य होय ज्ञानेश्वर महाराजांचे पणतू गहिनीनाथ महाराज यांचे नातू श्रीरंग महाराज यांचे चिरंजीव गीते ईश्वर महाराज किती लहान बालक आहेत पण किती सुंदर भजन करतात अशा लहान वयात ते लिंग पूजा करतात आणि चक्रीभजनात तल्लीन होऊन नसतात अभंग गातात हे डोळ्यांनी पाहिले म्हणजे उपासनेचा वारसा कसा त्यांच्यात रुजला आहे हे अनुभवास येते लहान वयात ही भजन पूजन चक्रीभजन सेवेची आवड व सातत्य ही कौतुकास्पद म्हणावी लागेल. श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांना एकषष्ठी प्रित्यर्थ शुभाशीर्वाद देऊन सर्व महाराज परिवार व त्यांचे भक्तगणांना काशी पिठाचा आशीर्वाद आहे राहील असे काशी महास्वामीजींनी म्हटले.
काशी महास्वामीजी व गोविंद गिरीजी यांच्या
पावन उपस्थितीत गुरुबाबांची तुला संपन्न

गुरुबाबांच्या एकषष्ठी प्रित्यर्थ या धर्मसभेत सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांची तुलाभार करण्यात आली नाथ संस्थानच्या समस्त भक्त परिवार व शिष्यांतर्फे गुरुबाबांना आहेर करून 61 हजार 61 रुपयाची थैली देऊन त्यांना जगद्गुरुंच्या साक्षीत्वात सन्मानित करण्यात आले.

या धर्मसभेवेळी व तुलाभार व ग्रंथ प्रकाशन सोहळा कार्यक्रमात श्री गोरखनाथ महाराज श्री बसवंतराव देशमुख श्री मच्छिंद्रनाथ महाराज श्री डॉक्टर विरनाथ महाराज त्यांचे चिरंजीव महाराज श्री अनिरुद्ध महाराज श्री श्रीरंग महाराज श्री सिद्धराज महाराज श्री ज्ञानराज महाराज गीतेश्वर महाराज सौ नीता वहिनी महाराज सौ संचिता वहिनी महाराज व सर्व अवसेकर महाराज कुटुंबीय नातेवाईक व महाराष्ट्र आंध्र कर्नाटक तेलंगणा व लातूर जिल्ह्यातून बहुसंख्येने आलेले सर्व शिष्यवर्ग त्याचप्रमाणे श्री व्यंकटरावजी गायकवाड श्री जितेंद्र जी शिंदे श्री रामेश्वरजी बद्दर श्री.नितीन भाऊ शेटे श्री.मेघराज बरबडे पुण्याहुन आलेले श्री.शंतनु गाडवे हलवाई. श्री.गोविंदरावजी माकने, श्री कपिल माकने. श्री.सुरेशअप्पा ठेसे, श्री बालाजीराव पुणे, श्रीकांतराव पाटील, शेषराव साळुंखे डॉक्टर मनोहर, आर्किटेक्ट गोपाळराव शिंदे श्री विक्रम सिंह जी चव्हाण वेशास श्री पुरुष तमाचार्य जोशी विटुरकर श्री बालाजी देव अर्जुन ढगे दिलीप तोडकरी श्री शंकरांअण्णा रकसाळे विविध क्षेत्रातील मान्यवर व शिष्यवर्ग उपस्थित होता .




