आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा कासारसिरसी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय मंजूर..
निलंगा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कासार सिरसी मंडळातील ६८ गावांसाठी कासार सिरसी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कासार सिरसी मंडळातील ६८ गावांसाठी स्वतंत्र उपअभियंता, ४ शाखा अभियंता व कार्यालयीन कर्मचारी मिळणार असून या ६८ गावांमधील नागरिकांना आता सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित कामांसाठी आता औसा येथील उपविभागीय कार्यालत फेऱ्या मारण्याची गरज नाही .
यामुळे कासार सिरसी मंडळातील रस्त्यांचे प्रस्ताव तयार करणे, मंजुरी मिळवणे व कामे वेळेत व गुंवतापूर्वक पूर्ण करणे या विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती प्राप्त होणार आहे तसेच रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये सुद्धा गतिमानता येणार आहे. उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम (इमारती), उपविभाग क्र. २ चा कार्यभार उपविभाग क्र. १ कडे हस्तांतरित करून उपविभाग क्र. २ हे कार्यालय मंजूर पदांसह कासार सिरसी या ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी स्थलांतरित करण्यात येत असल्याने शासनावरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. कासार सिरसीकरांची सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय कार्यालयाची मागणी पूर्णत्वास नेल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री गिरीशजी महाजन यांचे आभार मानले आहेत.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कासारसिरसी येथे मंजूर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालयामुळे या भागातील विकास कामांना गती मिळणार आहे.मिळालेल्या या मंजुरीबद्दल या भागातील नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांचे आभार मानले आहेत. कासारसिरसी मंडळाच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्यालय – ज्ञानेश्वर वाकडे
कासारसिरसी मंडळासाठी हि खुप महत्वाची बाब असून ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय मंजूर होणे बहुधा हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी आमच्या नेत्यांनी हे करून दाखवले आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे यांनी दिली आहे.




