लातूर ; दि.२९ ( माध्यम वृत्तसेवा) —लातूर मधील ज्येष्ठ कलावंत व संगीत तज्ञ श्री.किरण भावठाणकर यांनी लिहिलेल्या “आयी चांदनी रात ” या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी आवर्तन व अष्टविनायक आयोजित 89 व्या मासिक संगीत सभेच्या निमित्ताने संपन्न होत आहे .
थोर संगीत तज्ञ संगीत प्रसारक व प्रचारक संगीत महामोहपाध्याय पंडित स.भ. देशपांडे यांच्या जीवन प्रवासावर व सांगीतिक कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन पंडित विकास कशाळकर (अध्यक्ष अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई) यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे याप्रसंगी पंडित स.भ. देशपांडे यांचे ज्येष्ठ शिष्य व ख्यातनाम ज्येष्ठ कलावंत सूरमणी पंडित कमलाकर परळीकर व पंडित पांडुरंग मुखडे (उपाध्यक्ष अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई ) हे ही उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणारी अनेक ज्येष्ठ शिष्य मंडळी तसेच अखिल भारतीय गांधर्व मंडळ पदाधिकारी व रसिक मंडळी उपस्थित राहणार आहेत.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पठडीतील त्यांचे जेष्ठ शिष्य पंडित विनायक बुवा पटवर्धन यांचे पट शिष्य म्हणून पंडित स.भ.देशपांडे यांचे नाव घेतले जाते गांधर्व मंडळाच्या कार्याचा विस्तार संपूर्ण देशभरात करण्यात पंडित स.भ. देशपांडे यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता श्री अष्टविनायक मंदिराच्या गणेश हॉलमध्ये संपन्न होणाऱ्या या भव्य प्रकाशन समारंभास संगीत क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील सर्व रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभय शहा सचिव डॉक्टर रविराज पोरे प्राध्यापक हरी सर्वोत्तम जोशी प्राध्यापक संदीप जगदाळे श्री संजय सुवर्णकार श्री देवदत्त कुलकर्णी श्री दिनकर पाटील सतीश मिरखलकर, तसेच कोषाध्यक्ष श्री केशव जोशी यांनी केले आहे.