24.5 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*कृष्णा नेहरिया बाॅक्सिंग स्पर्धेत ठरला तीन सुवर्णपदकांचा मानकरी*

*कृष्णा नेहरिया बाॅक्सिंग स्पर्धेत ठरला तीन सुवर्णपदकांचा मानकरी*

सुवर्णपदकाच्या कामगिरीने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा

इचलकरंजी ; दि.८ (सागर बाणदार )–

इचलकरंजी येथील यंञमाग कारखान्यातील दिवाणजीचा मुलगा कृष्णा राजेंद्र नेहरिया याने राज्य व राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध करत तीन सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला.अगदी राज्य पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मिळवलेल्या त्याच्या या यशाच्या कामगिरीने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.याबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

येथील तीन बत्ती चार रस्ता चौक परिसरात राहणारे राजेंद्र नेहरिया हे एका यंञमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करतात.त्यांची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असली तरी ते व त्यांची पत्नी हे दोघे आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कायम प्रयत्न असतात.त्यांचा मुलगा कृष्णा हा सध्या गॅलॅक्सी इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी काॅमर्सचे शिक्षण घेत आहे.त्याला अभ्यासाबरोबरच बाॅक्सींग खेळाची प्रचंड आवड आहे.

त्यामुळे राजेंद्र नेहरिया व त्यांच्या कुटूंबाने त्याला बाॅक्सींग खेळाच्या नियमित सरावासाठी प्रशिक्षक सागर चव्हाण यांच्याकडे दाखल केले आहे.त्यामुळे कृष्णा याचा नियमित सराव ,प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व ध्येय साध्य करण्याची धडपड प्रकर्षाने दिसून येत आहे.नुकताच मे महिन्यात अहमदनगर येथे ऑल महाराष्ट्र स्टेट किक बाॅक्सिंग सिलेक्शन चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत कृष्णा नेहरिया याने १६ ते १८ वयोगटातील ६८ किलो वजनी गटामध्ये आपले कौशल्य सिद्ध करत सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला.तसेच जून महिन्यात पंजाबच्या अमृतसर येथे झालेल्या ऑल इंडिया यसदा नॅशनल बाॅक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत त्याने १६ ते १८ वयोगटात ६८ किलो वजनी गटामध्ये चांगले यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले.ही यशाची मालिका सुरु असतानाच त्याने पुन्हा जुलै महिन्यात नेपाळच्या काठमांडू येथे झालेल्या निमंत्रित आंतरराष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत १७ वयोगटातील ६८ किलो वजनी गटामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत यश मिळवत सुवर्णपदक पटकावले.

एकंदरीत ,सलग तीन स्पर्धांमध्ये कृष्णा नेहरिया याने मोठ्या जिद्दीने सुवर्णपदक पटकावत आपले बाॅक्सिंग स्पर्धेतील कौशल्य सिद्ध करत वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.एका दिवाणजी कामगाराच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बाॅक्सिंग स्पर्धेत मिळवलेले उत्तुंग यश भविष्यात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चितच स्वत:ची योग्यता सिद्ध करेल ,याची चुणूक दाखवणारी ठरली आहे. यासाठी त्याला समाजाच्या आर्थिक व विविध स्वरुपातील पाठबळाची मदत मिळाल्यास त्याचा उत्तुंग यशाला गवसणी घालण्याचा मार्ग सुकर बनणार आहे.
या यशासाठी त्याला बाॅक्सिंग खेळाचे प्रशिक्षक सागर चव्हाण ,फोर्स करियर अकॅडमीचे संस्थापक संभाजी बन्ने ,आलम खतीब , गॅलॅक्सी
इंग्लिश मिडीयम ज्युनिअर कॉलेजचे अनिल बेलेकर
यांचे मौलिक मार्गदर्शन व आई – वडिलांचे प्रोत्साहन लाभले.या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]