20.8 C
Pune
Friday, December 19, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीकेशवराज देवस्थानला अडीच कोटीचा निधी

केशवराज देवस्थानला अडीच कोटीचा निधी

केशवराज देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार 

लातूर, दि. ०३ :

बाराव्या शतकातील स्वयंभू श्री केशवराज मंदिर देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी तब्बल २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर  केल्याबद्दल देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने रविवारी पालकमंत्री अमित देशमुख यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.                          राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी  मंदिरांचा सर्वांगिण  विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाड्यातील देवस्थानांसाठी ९० कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. श्री केशवराज मंदिर हे लातूर शहरातील अत्यंत प्राचीन व जागृत मंदिर असून या मंदिरातील श्री केशवराजाची मूर्ती स्वयंभू आहे. केशवराज मंदिर परिसराच्या विविध विकास कामांसाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी सातत्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना अधिकाधिक निधी देण्याची गळ  घातली होती. त्यामुळे अमित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने ठाकरे यांनी अडीच कोटींचा  निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने देशमुख यांचा केशवराजची  प्रतिमा, महावस्त्र देऊन त्यांचा हृद्य सत्कार केला. यावेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले की, येत्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केशवराज मंदिरच्या या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येईल. लातूर शहरातील एक जागृत देवस्थान म्हणून केशवराज मंदिर परिचित आहे. या प्राचीन मंदिराच्या विकासकामांमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यातही वाढ होणार आहे. या स्वयंभू देवस्थानाची  ख्याती राज्यात सर्वदूर पसरली आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असल्याने विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून घेण्याच्या आपल्या प्रयत्नाला केशवराजाच्या कृपेने यश आल्याचे त्यांनी सांगितले.  

याप्रसंगी  केशवराज मंदिरचे अध्यक्ष एड. संजय पांडे, उपाध्यक्ष बजरंगलाल रांदड, सचिव अशोक  गोविंदपूरकर, विश्वस्त पापासेठ ताथोडे , दामुशेठ भुतडा, मनोहर सावळे, मधुकर पाठक ,  शिरीष कोटलवार, मुकेश रांदड,  सुमुख गोविंदपूरकर , गुंडोपंत  भातलवंडे,  कृष्णा कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्वानी अमित देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत. 
——————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]