शिरूर अनंतपाळ-(प्रतिनिधी)-
शिरूर अनंतपाळ शहरातील शिवनेरी महाविद्यालयातील प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या सहकार महर्षी कै.ॲड.विश्वंभरराव माने पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा दि. ६ मे रोजी माजी युवक कल्याण, क्रिडा,पुनर्वसन मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवनेरी महाविद्यालयाचे सचिव पदमाकर मोगरगे,उपाध्यक्ष अॅड सुतेज माने, जिल्हा बॅकेचे संचालक जयेश माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
तालुक्यातील लक्कड जवळगा येथील भुमीपुत्र कै. अॅड. विश्वंभरराव माने यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार,सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची कायम आठवण राहावी,त्यांच्या रोखठोक बोलण्याचा स्वभाव व त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतमजूर यांच्या पाल्यांना एक भव्य शैक्षणिक दालन उभे करून दिले.त्यामुळे त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासाठी संस्थेच्या वतीने संस्थेच्या भव्य प्रांगणात सहकार महर्षी कै. अॅड विश्वंभरराव माने पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
या स्मारकाचे अनावरण माजी आरोग्य मंत्री आ. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आ. अमित देशमुख, माजी कामगार मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,खा.सुधाकर शृंगारे, आ.धिरज देशमुख, माजी राज्य मंत्री आ.संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर,आ.अभिमन्यू पवार, हिंगोलीचे खा.हेमंत पाटील,नायगावचे आ.राजेश पवार,आ.विक्रम काळे, धाराशिवचे आ.कैलास पाटील,आ. सतीश चव्हाण, आ.राम पाटील रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ सोहळा दि. ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शिवनेरी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.
सहकार महर्षी कै.ॲड.विश्वंभरराव माने पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्था सचिव पदमाकर मोगरगे संस्था अध्यक्ष प्रतापराव माने, संस्था कोषाध्यक्ष जयेश माने,उपाध्यक्ष अॅड सुतेज माने यांनी केले आहे.





