39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeउद्योग*'कोण होणार करोडपती' च्या मंचावर येणार काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबादारी पेलणारे अधिक...

*’कोण होणार करोडपती’ च्या मंचावर येणार काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबादारी पेलणारे अधिक कदम*

मुंबई २९ जून २०२२ : सोनी मराठी वाहिनीवरील जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सचिन खेडेकर यांचे बहारदार सूत्रसंचलन हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य आहे . या कार्यक्रमात दर आठवड्यात विशेष अतिथी येत असतात . या आठवड्यात शनिवार २ जुलै च्या कर्मवीर विशेष भागात कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत . काश्मिरी मुलींसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातील कर्मवीर आहेत .

अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतातकुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो,असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात.’कोण होणार करोडपती’च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आ १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात कथन केले आहेत.

कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागीहोणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्यासामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागातअधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात ‘अधिक भैय्या’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात.

कारण जम्मूकाश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्यापायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेततर सध्या २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हेसगळे अनुभव ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकता येणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच अधिक कदम यांचे अचंबित करणारे अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’- कर्मवीर विशेष,२ जुलै शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]