39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसामाजिककोरोना काळात अंगणवाडीताईचे कार्य उल्लेखनीय

कोरोना काळात अंगणवाडीताईचे कार्य उल्लेखनीय

*कोरोना काळातील अंगणवाडीताई, मदतनीस व शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय*

*-राज्यमंत्री संजय बनसोडे* 

लातूर, (जिमाका) दि.20-

  मागील दोन वर्षात वैश्विक महामारीच्या काळात अंगणवाडीताई व शिक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य केले आहे, असे गौरवोदगार राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. 

लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या गौरव करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर,  विधान परिषद सदस्य रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतताई सोळुंके, कृषि व पुशसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण देवदत्त गिरी, आरोग्य व बांधकाम सभापती सौ. संगीता घुले, शिक्षणाधिकारी प्राथमिकचे वंदना फुटाणे, सीडीपीओ श्री. बंडगर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदिंची उपस्थिती होती.

 लातूर जिल्हा म्हणजे गुणवंतांची खान आहे आज महाराष्ट्रात आणि देशात आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविली आहे. तेथील शिक्षकांच्या सगळ्यांच्या कार्यामुळे डॉक्टर, इजिनियअर, प्रशासनातील अधिकारी अशा विविध क्षेत्रात लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नावं कमावले आहे. मागील कित्येक वर्ष महाराष्ट्रात नव्हे, तर देशात लातूर पॅटर्नचा बोलबाला आहे. कोरोनाच्या संकटामध्ये तुम्ही खूप रात्रीचा दिवस करून आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी काम केलेले आहे.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की,   या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्रजी पवार यांनी राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायतराजची अंमलबजावणी केली. लातूर जिल्हा परिषदेने  मागील पाच वर्षे सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं आहे. महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्याचा लातूर पॅटर्न त्यांनी गाजवला आहे  .

 लातूरच्या विकासात आपण सगळेजण मिळून हातात – हात घालून आपल्या लातूर जिल्ह्याचा विकास आपण केला पाहिजे. ग्रामीण भागातल्या जे कांही  पाणंद रस्ते असतील, तिथे रस्ते चांगल्या पद्धतीने रस्ते निर्माण व दुरुस्ती करण्याचा प्रयत्न राहणार आहे. 

तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती या तुटपुंज्या मानधनात काम करित असतात.  त्यांनी कोविड सारख्या महामारीच्या काळात अतिशय उत्तम कार्य केले आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. तसेच जिल्ह्यातील 2 हजार 400 अंगणवाड्यापैकी 1 हजार अंगणवाड्या दर्जा प्राप्त झालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे दोन हजार पाचशे वाढ केली आहे. याबाबत या अधिवेशनात तरतूद केली आहे.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, नागरिकांनी निसर्गाचे संगोपन, संवर्धन करावे. आपण पंचमहाभूत अग्नी, वायू,आकाश यांना जपण्याच्या दृष्टीकोनातून जिथे मोकळी जागा असेल, तिथे आपण वृक्ष लगावड करण्याचे सामाजिक कार्यही करावे लागणार आहे. विकास हा शाश्वत झाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर,  विधान परिषद सदस्य रमेश कराड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल तसेच प्रातिनिधीक स्वरुपात शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांचीही मनोगते व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]