कोरोना जागर
कोविड या आजारातून बरे झाल्यांनतरही अनेक परिणाम दिसून आल्याचे निरीक्षण आहे. त्यासंदर्भात खूप गैरसमज, भीती, धास्ती, काळजी जनमानसात आहेच. त्यावर शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती हाच उपाय आहे. बुद्धिभेदाला ज्ञानच छेद देवू शकते. यासाठी माहिती व जाणीव निर्माण करण्याचा एक प्रयत्न सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान (पानगाव, जि. लातूर) व प्रतिष्ठान अंतर्गत मराठी विज्ञान परिषद, पानगाव विभाग यांच्यातर्फे ‘कोरोना जागर’ उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवाद मालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आजवर सहा सत्रे झाली आहेत.
७ व्या सत्रात दि. २५ जुलै, २०२१, रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता, डॉ. शिरीष पाटील (गॅलॅक्सी हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर), डॉ. सुनीता पाटील (माऊली क्रिटिकल सेंटर) या अतिदक्षता तज्ज्ञांचे व विख्यात शरीरविकृतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. ऋजुता अयाचित यांचे ‘कोविड-१९ पश्चात आरोग्य समस्या, निदान व उपचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यानंतर श्रोत्यांचे शंकानिरसन करण्यात येणार आहे.

आपणास विनंती आहे, की आपण यात सहभागी व्हावे. तसेच, शिक्षक, प्राध्यापक यांना विनंती आहे की, आपण आपल्या विद्यालयातील, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, आबालवृद्ध यांच्यापर्यंत या उपक्रमाची माहिती देवून सहभागी होण्यास प्रवृत्त करावे. सहभागी होण्यासाठी खालील दुव्यांचा वापर करावा –
https://us02web.zoom.us/j/84734357153?pwd=Z0xrb0R5eVR5M2JrNytLcFhYdUJDQT09 किंवा https://www.facebook.com/sks.pratishthan
——————————————
आजवर झालेल्या सत्रांचे यूट्यूब वर अवलोकन करू शकता.
१ ले सत्र – कोरोना, संसर्ग व निदानपद्धती डॉ. बी. एस. नागोबा
(यू ट्यूब लिंक : https://youtu.be/9ltP0zfxYeE)
२ रे सत्र कोरोना – प्रसार व प्रतिबंध डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)
(यू ट्यूब लिंक : https://youtu.be/UCFlaNIa9I4)
३ रे सत्र कोविड १९ – विविध अद्ययावत रोगनिदानपद्धती डॉ. ऋजुता अयाचित,
प्रा. डॉ. महेश उगले (यू ट्यूब लिंक : https://youtu.be/1mgMseyWJII)
४ थे सत्र कोविड १९ काय आहे ? – १ आजार,लक्षणे व उपचारप्रणाली डॉ. अरुण मोरे
(यू ट्यूब लिंक : https://youtu.be/7I1FlAGIGvU)
५ वे सत्र कोविड १९ काय आहे ? – २ आजार,लक्षणे व उपचारप्रणाली
डॉ. सुनीता पाटील (यू ट्यूब लिंक : https://youtu.be/gR0KT5RA4To)
६ वे सत्र कोविड १९ – लस आणि प्रतिबंध भाग १ भाग २ – डॉ. मुकुंद भिसे
(यूट्यूब लिंक भाग १ – https://youtu.be/2UDt00CEXKo व भाग २ – https://youtu.be/dryu24Ctl3M)
—————————————-
सर्व माहितीस्तव भेट द्या – www.skspratishthan.com











