लातूर दि.१२– रेणापूर शहरालगत असलेल्या सेवादास नगर येथील बंजारा समाज बांधवाकडून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा. तीरत सिंह रावत, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. विनोदजी गोटिया, खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचे रविवारी सायंकाळी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील पारंपारिक वेशभूषेतील महिला भगिनींनी नृत्य सादर करून देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो… या सह विविध घोषणा देऊन वाजत गाजत पाहुण्यांचे स्वागत केले.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या जनसंपर्क अभियानाच्या अंतर्गत मौजे सेवादास नगर येथे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा. तीरत सिंह रावत, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. विनोदजी गोटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी संवाद कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूर जिल्हा प्रभारी प्रा. किरण पाटील, लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, सतीश आंबेकर, अनिल भिसे, भागवत सोट, रोहिदास वाघमारे, बालाजी पाटील चाकूरकर, धर्मपाल नादरगे, तालूकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने गेल्या नऊ वर्षात केलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती देऊन लाभार्थ्याशी संवाद केला. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने गोरगरिबांसाठी काहीच केले नसल्याचे सांगून घरकुल, गॅस, किसान पेन्शन, मोफत राशन, आरोग्य सुविधा यासह विविध योजनेचा गरजूंना लाभ मिळत असल्याची खात्री करून घेतली. उपस्थित लाभार्थ्यांनीही विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देऊन मोदींनाच आमचे समर्थन असल्याचे बोलून दाखविले तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी सेवादासनगर वस्तीत येत्या चार महिन्यात संत सेवालाल महाराज सभागृह बांधून देणार असल्याची घोषणा करून सर्वांगिन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.

यावेळी दिनकर राठोड भाजपा शहराध्यक्ष दत्ता सरवदे, माजी सभापती विजय चव्हाण, उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, सुरेंद्र गोडभरले, चंद्रकांत कातळे, माजी नगराध्यक्ष आरती राठोड, ललिता कांबळे, शिला आचार्य, उत्तम चव्हाण, सुनील चेवले, श्रीकृष्ण पवार, राजू आलापुरे, शेख अजीम, सिद्धेश्वर मामडगे, रमा चव्हाण, सुरेश बुडडे, अनुसया फड, रमा फुलारी, शालिक गोडभरले, नानासाहेब कसपटे, शेख जलील, श्रीमंत नागरगोजे, दिलीप चव्हाण, योगेश राठोड, गणेश चव्हाण, गणेश माळेगावकर, संतोष राठोड, सचिन शिरसकर, राजकुमार मानमोडे, विपुल चेपट, सेवादास नगर येथील दगडू चव्हाण, प्रभू जाधव, दासू राठोड, प्रभू राठोड, शेषराव पवार, शरद जाधव, वामन जाधव, धनराज राठोड, अनिल जाधव, विकास राठोड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.