28.1 C
Pune
Wednesday, September 10, 2025
Homeराजकीय*खा.सुधाकर शृंगारे यांनी साधला मतदारांशी संवाद*

*खा.सुधाकर शृंगारे यांनी साधला मतदारांशी संवाद*

भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूरात प्रचार  फेरी

लातूर/प्रतिनिधी : भाजपा, महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भाजपा महायुतीच्या वतीने लातूर शहरामध्ये प्रचार फेरी संपन्न झाली. खा. शृंगारे यांनी शहराच्या विविध भागात भेटी देत मतदारांशी संवाद साधला.  


शहरातील महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडल, छत्रपती शिवाजी महाराज मंडल, महात्मा बसवेश्वर मंडल, बाबासाहेब आंबेडकर मंडल, पू. अहिल्यादेवी होळकर मंडल व सिद्धेश्वर मंडलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रचारफेरी दरम्यान उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्यासोबत परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सुधाकर शृंगारे यांनी नागरिकांना पक्षाचा जाहीरनामा देऊन मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.


लातूर शहरातील प्रचार दौर्‍यात भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, मंडल अध्यक्ष अमोल गीते, भाजपाचे सरचिटणीस अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश गोमसाळे, माजी नगरसेवक सुनिल मलवाड, दीपक मठपती, दीपाताई गीते, शोभाताई पाटील, बुथ प्रमुख दिशा देशमुख, विवेक बाजपाई यांची प्रमुख उपस्थिती होती.


सकाळी 11 वाजता खा. सुधाकर शृंगारे यांनी प्रचार फेरीस सुरुवात केली. यादरम्यान ठिकठिकाणी खा. शृंगारे यांचे प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यादरम्यान शृंगारे यांनी व्यापारी, चहा स्टॉल, किराणा दुकानदार, भाजी स्टॉल, इस्त्री दुकानदार तसेच इतर छोट्या व्यवसायिकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे प्रभागातील महिलांनीही सुधाकर शृंगारे यांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहित केले.


निखिल गायकवाड, विशाल हवा पाटील, देवा साळुंखे, नितीन जोगदंड, याकुब शेख, अनंत अरसनळकर, धनु अवस्कर, रुपेश ढगे, योगेश कोळी, अजय अहिलवाड, राजकला चामे, पार्वती माने, सारिका काकडे, उषा माने यांच्यासह प्रत्येक प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]