केंद्रीयमंञी नितीन गडकरी यांच्या मसलगा येथील भारतातील पहिला आधुनिक उच्चतंञज्ञानाने बनविलेल्या पुलाच्या पाहणीसाठी दौरा..
प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी पूर्वआढावा घेतला..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या मसलगा येथील भारतातील पहिला पुल विकसित करण्यात आल्याने त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.दरम्यान, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लि ; पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक रमेश गाढवे यांच्यासमावेत पुलाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत.

माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 752) सद्यस्थितीला पुर्णत्वाकडे आहे.मलेशियन डयुरा सिस्टिमने बनविलेल्या या पुलासाठी आधुनिक उच्चतंञज्ञानाच्या जोरावर हा पुल विकसित करण्यात आला आहे.लोदगा येथे 01:30 ते 02:00 (राखीव) त्यानंतर मसलगा ( सोळ ) नदीजवळील भारतातील पहिल्या पुलाची पाहणी करण्यासाठी दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी 03:30 ते 04:00 दरम्यान केंद्रिय मंञी नितीन गडकरी येणार आहेत.


प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी मसलगा येथील पुलाची पाहणी करुन प्रकल्प व्यवस्थापक रमेश गाढवे यांच्याशी संवाद साधून कामाचा आढावा घेतला आणि पुठील सूचनाही करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी रोहित पाटील,तानाजी बिराजदार,ज्ञानेश्वर चेवले,अशोक शिंदे,रमेश पाटील,विजयकुमार देशमुख, रूषी जावळे आदी जणांची उपस्थिती होती.












