संभाजीराजांचा पीळ आणि निष्ठा पायदळी तुडवल्या
औरंगाबाद ( राजेंद्र शहापूरकर) –
औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्र्यासह पाच आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जात शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे ज्येष्ठ सेनानेते माजी मंत्री दिवाकर रावते कमालीचे संतप्त आणि त्याच बरोबर व्याकूळ झाले आहेत.

दिवाकर रावते केवळ शिवसेना नेते किंवा माजी मंत्रीच नाहीत तर मराठवाड्यात शिवसेनेचे झाड लावून ते मोठे करण्यात मोलाचे योगदान आहे. मुंबईचे महापौर आणि स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष राहिलेल्या या रावतेंनी मुंबईचे आरामदायी जीवन सोडून १९८० च्या दशकात मराठवाड्याच्या भूमीत स्वतः ला गाडून घेऊन शिवसेनेची उभारणी केली . त्यामुळे या घटनेने त्यांचे दुःख शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.या प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. छत्रपती संभाजीराजेंचा पीळ आणि निष्ठा पायदळी तुडविणाऱ्या शहराला राजांचे नाव पाहिजे पाहिजे कशाला ? असा सवाल करतानाच अहो, मी जिवंतपणी मरणयातना भोगतोय अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.