29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeकृषी*गळीत हंगाम यशस्वीतेसाठी विलास कारखाना सज्ज*

*गळीत हंगाम यशस्वीतेसाठी विलास कारखाना सज्ज*

चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते विलास साखर कारखाना युनीट १ चे बॉयलर अग्निप्रदिपन

लातूर ;३० आक्टोंबर २२ :
विलास सहकारी साखर कारखाना वैशालीनगर, निवळी युनीट नंबर १ चे गळीत हंगाम सन २०२२-२३ चे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत महापूजा करून बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले आहे. यावेळी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. कारखाना चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यास सज्ज झाला आहे.


राज्याचे माजी वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभारणी करून यशस्वी वाटचाल करीत असलेल्या वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम सन २०२२-२३ ची तयारी पूर्ण झाली आहे. रवीवार दि. ३० आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विलास सहकारी साखर कारखाना लि. युनीट १ कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व्हा. चेअरमन ॲड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम सन २०२२-२३ चे कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन व झेडएलडी प्रकल्पातील बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले आहे.


माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने गत हंगामात लातूर जिल्हा आणि मराठवाडयात अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला असतांना लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना युनीट – १ ने दुपटीपेक्षा अधिक कार्यक्षमतेचा वापर करीत तब्बल ७ लाख ६३ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाले नंतरच गाळप हंगाम बंद करण्यात आलेला आहे. तसेच गाळप केलेल्या ऊसाला विक्रमी म्हणजे प्रतिटन २७७५ रुपये भाव दिला आहे.


गळीत हंगाम सन २०२२-२३ हंगामाची तयारी पूर्ण झाली असून या गळीत हंगामात देखील ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. याकरीता आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणेचे व हार्वेस्टरचे करार पुर्ण करण्यात आले आहेत. कारखाना हंगामात पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने कारखाना मेन्टेनन्सची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली.
गळीत हंगाम सन २०२२-२३ चे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत महापूजा करून बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले आहे. यावेळी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम सन २०२२-२३ यशस्वीतेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, अनिल पाटील, बाळासाहेब बिडवे, रजित पाटील, गोविंद डुरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर आदीसह कार्यक्रमास खाते प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी तसेच तोडणी-वाहतुक व पुरक कामाचे ठेकेदार उपस्थित होते. प्रारंभी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमाची महापूजा संचालक युवराज जाधव व सौ. राधा जाधव आणि झेडएलडी प्रकल्पाकडील महापूजा संचालक अनंत बारबोले व सौ सुरेखा बारबोले व सर्व संचालकांच्या हस्ते करण्यात आली. व्हा. चेअरमन रविंद्र काळे यांनी गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देऊन आभार मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल इंगळे पाटील यांनी केले.



सभासद व शेतकऱ्यांनी घेतलेल्या हार्वेस्टरचे
चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी केले पूजन

लातूर जिल्हयातील वाढते उसाचे क्षेत्र व उस तोडणी मजूरांची कमतरता पाहता विलास साखर कारखान्याने उस तोडणी यांत्रीकीकरणाला चालना दिली आहे. या अंतर्गत मोठया प्रमाणात हार्वेस्टर खरेदीसाठी चालना दिली जात आहे. या योजनेसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे वित्तीय सहकार्य लाभले आहे. या अंतर्गत विशाल पाटील (निवळी), हनुमंत जाधव (निवळी), कौशल्या माने (निवळी) यांनी खरेदी केलेल्या हार्वेस्टरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व्हा. चेअरमन ॲड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]