*गहिनीनाथ महाराज यांचे कीर्तन*

0
399

चांगले आई-वडील लाभणे मुलांचे भाग्यच..!
‘नाना हंचाटे’ यांचे प्रथम पुण्यस्मरणदिनी आयोजित किर्तनात सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे भावोद्गार

औसा,-(प्रतिनिधी)- चांगली मुलं, अपत्ये पोटी जन्मायला जसे भाग्य लाभते तसेच चांगले संस्कारीत, परमार्थी, सदाचारी, आई वडील मिळायला पुण्य हवं असते ज्यांनी संपूर्ण जीवन गुरुभक्तीत समर्पित करतांना, प्रपंचीक दुःख यातना पचवून कधीच निराश न होता निरंतर गुरुंनी सांगितलेली शिकवण, उपदेश हा स्वधर्म म्हणून अंगीकारला त्या गुरुधर्मच्या संस्थापक ‘नानांचा’ नाथसंस्थाला सार्थ अभिमान असून देवभक्तीपेक्षा गुरुभक्तीस प्राधान्य देणारे आमचे ‘नाना’ होते असे भावोद्गार नाथसंस्थानचे सद्गुरु तथा श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले.

स्व. नारायणराव शिवलिंगप्पा हंचाटे (नाना) यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला श्री. हिंगुलांबिका देवी मंदिराच्या समोर ‘नाना’ च्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ आयोजित किर्तनात औसेकर महाराज बोलत होते. सर्वप्रथम नानांचे चिरंजीव श्री. मच्छिंद्र हंचाटे यांनी पुष्पहार अर्पण करुन किर्तनस्थळी सद्गुरु गहिनीनाथ महाराजांचे मनोभावे स्वागत करुन दर्शन घेतले.

पुण्यतिथीच्या किर्तनसेवेसाठी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा
‘आपुलिया हिता जो असे जागता।
धन्य माता पिता तयाचिया ॥
कुळी कन्या पुत्र होती जी सात्वीक।
तयाचा हरेक वाटे देवा ॥
गीता- भागवत करीता श्रवण ।
अखंड चिंतन विठोबाचे॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।
तरी माझ्या दैवा पार नाही ॥’
या अभंगावर अत्यंत रसाळ, भक्तीप्रचुर, आत्मीयतेने शिष्याविषयींच्या हृदयातील भाव व्यक्त करतांना, सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज म्हणाले जा चांगला गुरु भेटायला नशीब, पुण्य लागते तसेच चांगला शिष्य भेटायलाही भाग्यच लागते. ‘नाना’ नाथसंस्थानचे एकनिष्ठ निस्सीम भक्त होते. माझे वडील चौथे पिठाधिश सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचे ‘नाना’ आवडते लाडके शिष्य होते. ‘नाना’ हंचाटे कुटुंब आणि भावसार समाजात काही नव-जुनं करायचं, ठरवायचं, निर्णय घ्यायच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा आदेश घेवूनच पाऊल उचलायचे. गुरुंच्या दर्शनाशिवाय, त्यांचे पश्चात ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन व गुरुधर्मचा अंक समाधीवर ठेवले नंतरच ते अन्नग्रहण करीत ही निरंतर व्रतसाधना होती. प्रत्येक उत्सवात, वारी, वाळवंट, नाथषष्ठी व दरवर्षीच्या श्रावणमास गुरुबाबांच्या चक्रीभजन अनुष्ठान सोहळ्यात ‘नानांची’ मोठी सेवा होती. त्यांनी आपले हित जाणले, गुरुंचा शब्द प्रमाण, वेद मानला. गुरुंना देवाचे स्थान हृदयात दिले आणि तन मन धन गुरुगादीसाठी हयातभर समर्पित केले म्हणून ‘नानां’चा विसर कधीच पडू शकणार नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या पश्चात आम्हा दोघा भावांवर आदरणीय गुरुबाबा, आम्ही असो तेवढीच श्रध्दा प्रेम होते हे विशेष.

यासाठी त्यांनी आपल्या सोबत हंचाटे कुटुंब, पाहुणे, परिवार आणि संपूर्ण भावसार समाज परमार्थ नित्यनेमाचे गुरुभक्तीच्या प्रवाहात आणला. सन्मार्गावर चालण्याचा मार्ग दाखवला असे गहिनीनाथ महाराज म्हणाले. गुरुंनी सांगितलेला धर्म आयुष्यभर जगणारे नाना गुरुधर्मी शिष्य होते. त्यांनी केलेली ईश्वरसेवा, गुरुभक्ती, दिलेला विचार, संस्कार यावर सर्व हंचाटे कुटुंबातील मुलं चालण्याचा प्रयत्न करतात ही समाधानाची गोष्ट असून नानांनी घालून दिलेली विचारधारा, धर्म, संस्कार, गुरु संगतीचा आदर्श जपवणूक करणे ही बाब ‘नानांना’ खरी आदरांजली वाहणे ठरेल हे असे घडलेच, घडावे यासाठी गुरुगादीचा आर्शिवाद कायम राहील असे महाराजांनी स्पष्ट केले.

‘नानांच्या’ पण्यतिथी प्रित्यर्थ सद्गुरु श्री. गहिनीनथ महाराजांच्या किर्तन सोहळ्यासाठी, नानांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई नारायण हंचाटे (आक्का), श्रीमती राजश्री चंद्रकांत हंचाटे, श्रीमती सरस्वतीबाई सुभाष हंचाटे, सुरेश हंचाटे, सौ. सुरेखा हंचाटे, श्री. मच्छिंद्रनाथ हंचाटे, सौ. माधवी हंचाटे, गोरख हंचाटे, सौ. गिताबाई हंचाटे, रोहित हंचाटे, सोलापूरच्या माळवदकर आत्या, सुदामराव डेंग, सौ. कौसल्याबाई डेंग, श्री. विजय जबडे, शंकरराव जबडे, प्रविण रंगदळ, सौ. रचना जबडे, सौ. रजनी रंगदळ, गोविंदकाका हंचाटे, कमलाकर वैजवाडे, बाळू वैजवाडे, महेश अपसिंगेकर, अ‍ॅड. गजानन कुसूमकर, प्रकाश कुसूमकर, धनंजय वैजवाडे, सुरेशप्पा ठेसे, राजकुमार पल्लोड, गायक श्री. अष्टेकर माऊली देव, विजयकुमार बनसोडे, तुकाराम बनसोडे,सुनिल चेळकर, दादासाहेब पंडीत, दिनकर महाराज निकम, मोगरगा वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख श्री. प्रशांत महाराज निकम व त्यांचा बाल टाळकरी संच, करजगावचे भजनी मंडळ व सोपान आबा दळवे, शंकरअण्णा रकसाळे, अर्जुन ढगे, दिनेश अपसिंगेकर आदी उपस्थित होते. किर्तनासाठी ऐसा व पंचक्रोशीतील शेकडो वारकरी, सद्भक्त आवर्जुन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here