विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत ….शरण पाटील
मुरुम, ता. उमरगा, ता. २५ (प्रतिनिधी) : बारावी परिक्षेत यश संपादन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले. मुरुम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात आयोजित इयत्ता १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी मंगळवारी (ता. २४) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रविण गायकवाड होते. यावेळी उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य सुधीर अंबर, नाईक नगरचे सरपंच योगेश राठोड, प्रतिभा निकेतन सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब पाटील, राहुल वाघ, राजु मुल्ला, गौस शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी कै. माधवराव पाटील उर्फ काका यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकरावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या व ९० टक्केपेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या २१ तर १२ वी बोर्डात कला वाणिज्य व विज्ञान शाखेत गुणानुक्रमे पहिला, दुसरा आलेल्या सहा गुणवंत असे एकूण २७ विद्यार्थ्यांचा शाल, फेटा व वैचारिक ग्रंथ भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तर सुयश नाकाडे यास भारत सरकारचा इन्स्पार अँवार्ड मिळाल्याने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी सतत धडपड करुन प्रयत्न केले पाहिजेत. उच्च शिक्षित होऊन अधिकारी बनून समाजसेवा करावी. आपल्या गावचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. यावेळी अशोक सपाटे, सचिन पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रविण गायकवाड यांनी केला. प्रा. आण्णाराव कांबळे, प्रा. सुधीर नाकाडे , प्रा. राजीव शाळु, प्रा. सुरेश मुर्गे, प्रा. शिवाजी राजोळे, प्रा. शोभा पटवारी, तात्यासाहेब शिंदे, भालेराव, चंद्रमप्पा कंटे, उल्हास घुरघुरे, इस्माईल जमादार, नामदेव राठोड, बालाजी सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सुधीर अंबर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. करबसप्पा ब्याळे तर आभार प्रा. कल्याणी टोपगे यांनी मानले.











