परोपकारातुन पुण्यसंचय होतो !
श्री.गुरुबाबा महाराज औसेकर.
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-पुण्यवंतांचे नाव सदैव मुखात असावे,त्यांचे चिंतन,ध्यास ठेवावा,त्याचबरोबर हातुन नेहमी परोपकार घडावा,ज्यामुळेच मनुष्यजीवाकडेपुण्यसंचय होतो,” बाबुराव पंडित” स्थूल-देहरूपाने आपल्यातुन गेले पण सुक्ष्म रुपात आठवणीने,सत्कर्म-परोपकारी वृत्तीने ते आजही आहेत, हे पुण्यवंतांचे लक्षण मानावे.असे विचार नाथसंवस्थांनचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी व्यक्त केले आहेत.
खुंटेगाव ता.औसा इथे संवस्थांनचे शिष्य व मृदंगवादक बंधु श्री.पुरूषोत्तम(दादा)पंडित,श्री विजयकुमार पंडित यांचे वडील कै.बाबुरावगोपीनाथराव पंडित ( वय वर्षे 85 ) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या गोडजेवणाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनात औसेकर महाराज बोलत होते .
नियोजित नियमाच्या खुंटेगावच्या हरिनाम सप्ताहात श्री विठ्ठल मंदिरात भव्य प्रासादात श्री गुरुबाबांच्या सुश्राव्य हरिकीर्तनाचा सोहळा झाला.
जगात कुणाला पुण्य नको आहे,कुणाला पाप पाहिजे आहे ? पण असं फुकट बसल्याजागी
मिळेल का हो पुण्य,मग काय नेमकं करायचे यांचे उत्तर श्रीमंत तुकोबांच्या या अभंगातून आपल्याला मिळते
पुण्यवंत व्हावें ।घेता सज्जनांची नांवे ।
नेघे माझी वाचा तुटी।महालाभ फुकासाठी।।
विश्रांतीचा ठावो । पायी संतांचिया गावो ।
तुका म्हणे पापे । जाती संतांचिया जपे ।।
हा अभंग निरुपणासाठी घेऊन गुरुबाबांनी
तो अत्यंत रसाळ-गोड-भक्ती माधुर्य व संतांच्या
वचनाधारे सोडवला,मुळात भारतभुमीच संतांची
म्हणुन ओळखण्यात येते.त्यांनी एवढं पुण्य कमवून ठेवलंय की या संतांच्या नावांचा जप
नामस्मरण केलात तर आपल्याजवळ पुण्याचं गाठोडं जमा होईल!काही न करता देरे हरी पलंगावरी असा दुसऱ्याच्या जीवावर परमार्थ आणि इतरांच्या पैशावर पंढरपूर केल्याने थोडेच
पुण्य मिळेल?असा सवाल करून गुरुबाबा
म्हणाले की,आधी तर पुण्य मिळणे कठीण त्यात ते टिकवणे त्याहून कठीण आहे. संतांचे तुकोबा,ज्ञानोबा मल्लनाथ विरनाथांचे उपकार पुण्याई म्हणुन आपण कीर्तनात बसलो आहोत. माणसा बरोबर त्याचे कर्म-पुण्याचं येते.
परोपकाराचे उदाहरण ठेवताना महाराज म्हणाले,असुरांवर विजय मिळवण्यासाठी देवाने चक्क दधिची ऋषिकडे त्यांच्या शरीराच्या हाडांची मागणी केली ती दधिची ऋषिंनी तत्काळ दिली,हा परोपकार लक्षात आणा असे महाराज म्हणाले! व पुण्य कराल तर प्रगट करू नका,आणि झालेले पाप झाकून ठेऊ नका, संतांच्या चरणापाशी ते खुले करा !असे सांगितले.वृध्दापकाळ जीवनात वाईट असा काळ तो चांगला व्यवस्थित जाण्यासाठी जीवनात संतांच्या नावाची त्यांच्या संगती सहवासाची कास धरावी! देवाने मी मी
म्हणणाऱ्या कंस,दुर्योधन, रावणाची ” रग ”
काढलीय, आपण तर किस झाड की पत्ती ?
असे म्हटले.

विजु पंडित-पुरुषोत्तम पंडित-संदिपान पंडीत
यांच्या चवदाव्या चे निमित्त आयोजित या किर्तन सोहळ्यास ,सर्वश्री, भानुदास पंडित,संदीपान पंडित, विजयकुमार पंडित, पुरुषोत्तम दादा पंडित,सुरेश वेदपाठक, रामदास पंडित,बंडू पोतदार, हसेगाववाडीचे सुभाषराव, शाम कुलकर्णी, आदिनाथ पाटील चोपदार,गुंडांनाथ सूर्यवंशी, विरोचन आंबूरे,
गायक विजयकुमार बनसोडे, आस्टेकर देव माऊली, आणि खुंटेगाव,सेलू, हसेगाव, जमालपुर, कव्हा,बुधोडा,व पंचक्रोशीतील
टाळकरी, वारकरी,समाज आणि पुज्य दादां च्या फडावरील शिष्यभक्त मंडळी आवर्जुन हजर होते.












