दहीहंडी फोडून गोपाळकाल्याने सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरण सोहळ्याची नामघोषात सांगता
. औसा; ( गोपाळपूर नगरी):-ज्ञानोबा तुकोबा वीरनाथ मल्लनाथाच्या व ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या नामघोषात हजारो भाविक शिष्यांच्या उपस्थितीत पिठारीपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात व सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शन तथा संचालनालात दहीहंडी फोडून गोपाळकाला संपन्न झाला. आदरणीय डॉ.श्री. वीरनाथ उर्फ राजाभाऊ महाराज घेतला दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळकाल्याचा प्रसाद सर्व उपस्थित त्यांनी घेतला.
भक्ती उत्साहात उत्सव संपन्न ……………………………….

दिनांक 28 नोव्हेंबर श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या समाधीस्थळी आरंभ झालेल्या या 25 व्या पुण्यस्मरण सोहळ्यात नित्य समाधीची ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात रुद्र पूजा विष्णू याग दररोज काकडा हरिपाठ सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर व श्री ज्ञानराज महाराज औसेकर यांचे चक्रीभजन दररोज सायंकाळी ख्यातनाम कीर्तनकारांची श्रवणीय कीर्तने व शुक्रवारी काशी महास्वामीजी श्री श्री श्री 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व आयोध्या क्षेत्राचे श्री गोविंद गिरीजी महाराज पंडित सुहास अंबाजोगाईची शिवाचार्य यांच्या उपस्थितीत संपन्न झालेली भव्य धर्मसभा पंडित सुहास व्यास यांच्यासह ज्ञानराज महाराज व पंडित व्यासांचे अधिपत्यात व ज्ञानराज महाराज यांच्या नियोजनात संपन्न झालेले शास्त्रीय संगीताची मैफल.

संत सद्गुरु दर्शन व महाप्रसादनामसंकीर्तनाचा जल्लोष सर्वांना आनंद देणारा ठरला. याच महोत्सवात धर्मसभेमध्ये संस्थांनचेशिष्य ॲड शाम भाऊ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रवचने गुरुबाबांची व नाचू कीर्तनाच्या रंगी या दोन पुस्तकांचे प्रकाशन संस्थांनच्या वतीने ही काशी महास्वामीजींच्या अमृत हस्ते संपन्न झाले .धर्मसभेत पीठाधीपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या 61 प्रित्यर्थ त्यांची तुलाभार सोहळासंपन्न झाला.
गोपाळकाल्याने उत्सवाची सांगता

सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात व सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या उत्सव व गोपाळकाल्याच्या सोहळ्यात श्री गोरखनाथ महाराज श्री वसंतराव देशमुख उर्फ पप्पू महाराज श्री राजाभाऊ महाराजश्री मच्छिंद्रनाथ महाराज .




