*ना कराड गोपीनाथ गडावर नतमस्तक*
*जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ*
बीड.. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या गोपीनाथ गड येथील समाधीवर नतमस्तक होऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना डॉ भागवत कराड यांच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला यावेळी भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी यात्रेला झेंडा दाखवून यात्रा मार्गस्थ केली.

यावेळी खा. प्रीतमताई मुंडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड, माजी राज्यमंत्री अतुल सावे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, रमाकांतबापू मुंडे, भाऊराव देशमुख भागवत सोट, सतीश आंबेकर, दिलीप धोत्रे, अमोल पाटील पत्रकार रामेश्वर बद्दर, वसंत करमुंडे, चंद्रकांत कातळे अमोल गीते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.












